समर-स्वानंदीच्या नात्यात दुरावा येणार
समर-स्वानंदी विरोधात मल्लिका रचते षडयंत्र
समर-स्वानंदी सहा महिन्यात वेगळे होणार
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या वटपौर्णिमा विशेष भाग पाहायला मिळत आहे. समर स्वानंदीला रोमँटिक अंदाजात प्रपोज करतो. ज्याचे होकारार्थी उत्तर स्वानंदी वटपौर्णिमेच्या दिवशी समरला देते. आता खऱ्या अर्थाने समर-स्वानंदीच्या प्रेमाच्या नात्याला सुरूवात होते. समर-स्वानंदी आपल्या भावंडाच्या सुखासाठी लग्न करतात, मात्र आता दोघांमध्ये प्रेमाचे नाते फुलताना दिसत आहे.
समर स्वानंदीसाठी वडाची पूजा करतो. दोघे एकत्र वडाची पूजा करतात. दोघांचे एक रोमँटिक गाणे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळते. आता खऱ्या अर्थाने समर-स्वानंदीच्या संसाराला सुरुवात होताना दिसत आहे. मात्र दोघांच्या सुखी संसारत मल्लिका नावाचा मिठाचा खडा पडतो. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा नुकताच नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात समर-स्वानंदी रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. तर मल्लिका त्या दोघांना वेगळे करण्यासाठी, त्यांचे नातं तोडण्याच्या प्रयत्न करताना दिसत आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, समर-स्वानंदी वटसावित्रीची पूजा करून घरी येतात आणि आजीच्या पाया पडतात. तेव्हा आजी आशीर्वाद देत म्हणते की, "देवा माझ्या पोरांनाना कोणाची दृष्ट नको लागू देऊस...इथून पुढे ना तुमच्या दोघांमधील प्रेम वाढत राहो..." त्यानंतर रुममध्ये समर-स्वानंदीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो. दोघे एकमेकांना प्रेमाच्या नजरेने पाहत असतात, त्यांचे हे प्रेम रुम बाहेर उभी राहून मल्लिका पाहते आणि म्हणते की, "यांच्यातले अंतर वाढायला हवे आहे मला..." असे बोलून मल्लिका भिंतीवर डोकं आपटायला लागते. तेवढ्यात अंशुमन आरडाओरडा करून समर-स्वानंदीला बोलावतो. समर धावत येतो. त्याला पाहून मल्लिका म्हणते की, "माझे डोकं दुखत आहे...मला वाटतं माझ्या डोक्यात गाठ आली आहे... " तेव्हा समर बोलतो की, "आपण आताचा आता डॉक्टरकडे जाऊया चल... " त्यानंतर अंशुमन स्वानंदीला बोलतो की, "तुमचा रोमँटिक क्षण डिस्टर्ब केला ना मी...सहा महिन्यात वेगळे होणार आहात तुम्ही" आता स्वानंदी आपले नाते कसे वाचवणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, "सहा महिन्यात तुटणार का समर आणि स्वानंदीच्या नात्यातील वीण?" व्हिडीओवर प्रेक्षक भरभरून कमेंट्स करत आहे. येणाऱ्या भागांमध्ये समर-स्वानंदीचे नाते कोणते वळण घेणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मल्लिकाची कारस्थाने खरंच समर-स्वानंदीचे नाते तोडणार की संकटांमधूनही दोघांचे प्रेम फुलणार हे सहा महिन्यात दिसेल. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7.30 वाजता पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.