Ranbir Kapoor- Ramayana : रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील क्लिप लीक? VIDEO पाहून नेटकरी चकित

Ramayana Movie Clip LEAKED : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातील एक क्लिप लीक झाली आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. व्हिडीओत नेमकं काय, जाणून घेऊयात.
Ramayana Movie Clip LEAKED
Ranbir Kapoor- RamayanaSAAM TV
Published On
Summary

'रामायण' चित्रपटातील एक क्लिप लीक

रणबीर कपूर दिसतोय प्रभू रामाच्या रुपात

'रामायण' हा चित्रपट नितेश तिवारी दिग्दर्शित आहे

रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'रामायण' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ लीक झाला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत 'रामायण' महाकाव्यातील एका लढाईच्या दृश्याचा सीन पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडीओत रणबीर कपूर भगवान श्री रामाच्या राजेशाही अवतारात दिसत आहे; तो एका मोठ्या राक्षसाला मारण्यासाठी धनुष्य बाण सोडतो आणि स्फोट होतो. अनेक ऑनलाइन पोस्ट्सनुसार, ही क्लिप निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनापूर्वी आयोजित केलेल्या चाहत्यांसाठीच्या विशेष प्रदर्शनादरम्यान किंवा प्रचार कार्यक्रमादरम्यान रेकॉर्ड केली असावी. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की या फुटेजची सत्यता अद्याप पडताळलेली नाही. मात्र ही क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

'रामायण'च्या या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या मते ही क्लिप 'एआय' (AI) प्रॉम्प्ट्स वापरून तयार केली असावी. तर इतर लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एका युझरने लिहिले, "रामायणात कोणत्या प्रकारचा राक्षस होता?" दुसऱ्याने लिहिलं की, "मला 'आदिपुरुष'ची आठवण येत आहे, 1200 कोटींचा आदिपुरुष..."

'रामायण' रिलीज डेट

'रामायण' हा चित्रपट नितेश तिवारी दिग्दर्शित आहे. २०१७ मध्ये या 'रामायण'ची घोषणा करण्यात आली होती. 'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग यावर्षी २०२६ च्या दिवाळीला तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायणात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. माता सीतेच्या भूमिकेत साऊथ अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे. तर रावणाची भूमिका साऊथ हिरो यश साकारणार आहे.

Ramayana Movie Clip LEAKED
Bollywood Actor : ३३ वर्षीय अभिनेत्याने साकारली १६ वर्षांच्या मुलाची भूमिका, बॉलिवूडचा 'हा' हिरो आहे तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com