Ranbir Kapoor-Ramayana : 'रामायण'मध्ये रणबीर कपूरचा डबल धमाका; प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता, स्वतः दिली कबुली

Ranbir Kapoor Double Role In Ramayana : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणार आहे. रणबीरने स्वतः याची माहिती दिली आहे.
Ranbir Kapoor Double Role In Ramayana
Ranbir Kapoor-Ramayana saam tv
Published On
Summary

'रामायण' चित्रपटाचा टीझर हनुमान जयंतीला रिलीज झाला.

'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामांच्या भूमिकेत झळकणार आहे.

'रामायण' चित्रपटात रणबीर कपूरचा डबल रोल आहे.

रणबीर कपूर सध्या त्याचा चित्रपट 'रामायण' मुळे चांगलाच चर्चेत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटात रणबीर कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. 'रामायण' च्या टीझरमध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच तो या चित्रपटात विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू परशुरामाची भूमिकाही साकारणार आहे. ही दुहेरी भूमिका या सुपरस्टारच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

२ एप्रिल रोजी 'रामायण' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर हा खुलासा करण्यात आला. टीझरमध्ये रणबूर कपूरला प्रभू रामाच्या रूपात पहिल्यांदा दाखवण्यात आले, ज्यात तो योद्ध्यापासून राजापर्यंत विविध अवतारांमध्ये दिसला. टीझरमध्ये राम राक्षसांशी लढताना दिसत आहे. रणबीर कपूरने 'रामायण'मधील दुहेरी भूमिकेची पुष्टी केली. दोन्ही भूमिका साकारण्याबद्दल लॉस एंजेलिसमध्ये फर्स्ट लूक टीझर लाँचच्या वेळी 'कोलायडर'शी बोलताना रणबीर कपूर म्हणाला, "भगवान विष्णूंचे वेगवेगळे अवतार होते. भगवान राम हा एक अवतार आहे आणि भगवान परशुराम हे भगवान रामांच्या आधीचे अवतार होते आणि त्या दोन्ही भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे विलक्षण होते."

रणबीर कपूर दोन वेगवेगळ्या भूमिकांविषयी बोलताना म्हणाला की, "मला वाटते की एक अभिनेता म्हणून, देहबोली व्यतिरिक्त, जर तुम्ही पात्रांची आध्यात्मिकता, भावनिकता खोलवर समजून घेतली, तर सर्व काही तिथूनच सुरू होते. मला वाटते की मी तेच केले, ही माणसे कोण आहेत, ही पात्रे कोण आहेत, ते कशासाठी उभे आहेत, त्यांचे हेतू काय आहेत, हे खऱ्या अर्थाने समजून घेतले आणि मग सर्व काही सोपे होते."

'रामायण'चा टीझर हनुमान जयंतीला प्रदर्शित झाला. २०१७ मध्ये या 'रामायण'ची घोषणा करण्यात आली होती. 'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग यावर्षी २०२६ च्या दिवाळीला तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.'रामायण' चित्रपटाचे दोन्ही भाग मिळून अंदाजे ₹४,००० कोटी बजेट आहे. या बजेटमुळे रामायण हा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे.रामायणात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. माता सीतेच्या भूमिकेत साऊथ अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे. तर रावणाची भूमिका यश साकारणार आहे.

Ranbir Kapoor Double Role In Ramayana
Artist Death : मनोरंजन विश्वावर शोककळा, सोशल मीडिया स्टारनं घेतला अखेरचा श्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com