Veen Doghantali Hi Tutena video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Veen Doghantali Hi Tutena video : "मी खाणं-पिणं सोडून देईन..."; समर स्वानंदीच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक संकटं, नव्या ट्विस्टनं राजवाडेंच्या घरात वादळ

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत पुन्हा एकदा नवीन ड्रामा पाहायला मिळणार आहे. सुष्मिताच्या येण्याने समर-स्वानंदीच्या आयुष्यात पुन्हा वादळ आले आहे.

Shreya Maskar

समर स्वानंदीच्या आयुष्यात नवं वादळ

सुष्मिताने राजवाडेंच्या घरात घातला धुमाकूळ

स्वानंदी सुष्मितावर चांगलीच भडकते

मराठी अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका सध्या प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करत आहे. या मालिकेत रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अंशुमन सुष्मिताशी लग्न करून आल्यामुळे घरातील वातावरण बिघडले आहे. अंशुमनच्या कटकारस्थानात सुष्मिता फसते आणि दोघांचे लग्न होते. समर या सर्वाचा सुष्मिताला जाब विचारतो तेव्हा सुष्मिता समरवर आवाज चढवते, जे पाहून स्वानंदीचा संताप होतो आणि ती सुष्मिताची चांगलीच शाळा घेते. अशात आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.

सुष्मिता घरात काळोख करते आणि ताट- चमचा वाजवून सर्व कुटुंबाला हॉलमध्ये बोलवते. जे पाहून राजवाडेंच्या घरातील सर्व सदस्य प्रश्नात पडतात. तेव्हा सुष्मिता म्हणते की, मला बोलायचं होतं सगळ्यांसोबत... तेव्हा स्वानंदी बोलते की, काय पद्धत झाली ही...त्यावर उत्तर देत सुष्मिता म्हणते की, माझं मॅरेज तुम्ही अंधारात ठेवत आहात...मला ग्रँड रिसेप्शन हवं आहे...मला जर माझं ड्रीम रिसेप्शन मिळाले नाही ना, तर मी खाणं-पिणं सोडून देईन..." हे ऐकताच समर आणि स्वानंदीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि घरातील सर्वांनाच धक्का बसतो.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत सध्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आता समर-स्वानंदी सुष्मिता आणि अंशुमनच्या लग्नाचे रिसेप्शन करणार की मालिकेत आणखी कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मलिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता पाहायला मिळते.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत एकाच वेळी अनेक घटना घडताना दिसत आहे. अंशुमनच्या लग्नानंतर आता चिंगीचे काय होणार, तिच्या पोटातील बाळाचे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे अधिराच्या आई होण्यावरून घरात ड्रामा पाहायला मिळत आहे. अधिराचे आपल्या सासूसोबत मोठे भांडण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेत जमिनीच्या वादातून दोन गटात वाद आणि शिवीगाळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT