Varun dhawan With Gigi Hadid Saam Tv
मनोरंजन बातम्या

Varun Dhawan Viral Video: वरुणने सर्वांसमोर का केलं हॉलिवूड अभिनेत्री गिगीला किस?, अभिनेत्याच्या उत्तराने नेटकरी पार गार

Varun Dhawan gets trolled: व्हायरल व्हिडिओमुळे वरुणला खूप ट्रोल केले जात आहे.

Pooja Dange

Varun Dhawan performed with Hadid at NMAAC: बॉलिवूडचा सुपर कूल अभिनेता वरुण धवन सध्या ट्रोल होत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लाँच सोहळ्याला तो उपस्थित होताच तसेच त्याने सादरीकरण देखील केले. या कार्यक्रमात वरुणशिवाय बॉलिवूडचे तसेच हॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकारही सहभागी झाले होते.

आता या कार्यक्रमातील वरुणचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो गिगी हदीदला उचलून घेतो आणि तिच्या गालावर किस करतो. या व्हिडिओमुळे वरुणला खूप ट्रोल केले जात आहे.

NMACC मधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओंमध्ये अनेक बी-टाऊन स्टार्स परफॉर्म करताना दिसत आहेत. असाच वरूनच एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो गिगी हदीदला उचलून तिच्या गालावर किस करताना दिसत आहे. वरुण नाचत-नाचत स्टेजच्या खाली जातो आणि गिगीला स्टेजवर घेऊन येतो. तिला गोलाकार फिरवतो. तसेच तिच्या गालावर किस करतो.

वरुणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. वरुणचा हा व्हिडीओ पाहून युजर्सला आनंद झाला नाही तर लोकांनी वरुणची शाळा घ्यायला सुरुवात केली.

एका युजरने कमेंट केली की, “तो डान्स करताना सर्व अभिनेत्रींना किस का करतो.” दुसर्‍या युजरने लिहिले, “काय वाईट कृत्य आहे.” तो चिकटल्याशिवाय राहू शकत नाही का?’ दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘वरूणला चांगले माहित आहे की डान्स करताना लोकांना कसे चिकटवायचे. बिचारी खूप भावनेने वाहून जाते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्याला ट्रोल करणार हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रसंगामागचे कारण सांगितले आहे. वरुणने ट्विट करत म्हटले आहे की, 'मला वाटतं आज तुम्ही फक्त झोपेतून उठला नाहीत तर जागे जागे देखील झाला आहेत . तर आता मला तुमचा गैरसमजूतीचा बुडबुडा फोडू द्या. तर तिला स्टेजवर आणणे हा प्लॅन होता, म्हणून बाहेर जाऊन गोष्टींबद्दल काहीतरी करण्यापेक्षा नवीन कारण शोधा. शुभ प्रभात' वरुणाचा या खोचक ट्विटमुळे आता ट्रोल करणाऱ्यांची बोलतीच बंद झाले असणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT