Ketaki Chitale Write Not For Enemy: अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे एक समीकरण झाले आहे. केतकी काही बोलली किंवा तिने काही पोस्ट केले की वाद हा होतोच. केतकी अभिनयात सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ती लोकांना तिची दाखल घ्यायला भाग पडते.
केतकीला तिचे बोलणे अनेकदा भोवले आहे. शरद पवार त्यांच्यावर केलेल्या विधानामुळे तिला अटक देखील झाली आहे. पण कितीही काहीही झालं तरी केतकी तिचं मत मांडताना दिसते. नुकतीच केतकीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. बघूया काय म्हटलं आहे केतकीने तिच्या पोस्टमध्ये.
केतकीने तिच्या फोटोसह एक मजकूर शेअर केला आहे. 'मी स्वतःला न्याय मिळविण्यासाठी लढत असले तरीही मी सत्य बोलत राहीन, मी फक्त जामिनावर बाहेर असले तरीही, तुम्ही कथन बदलून माझ्यावर नवीन केसेस लावल्या तरीही (मला म्हणायचे आहे की त्यात नवीन काय आहे, तुम्ही करत आहात. तरीही गेल्या ७ वर्षांपासून), तुम्ही माझ्याबद्दल खोट्या बातम्या तयार केल्या तरीही. काहीही न करता गप्प बसून मरण्यापेक्षा सत्य बोलतांना माझा खून झाला तरी चालेल.' असे खळबळजनक विधान केतकीने केले आहे.
त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये केतकीने लिहिले आहे, 'लोकांना सत्य ऐकायला/वाचायला आवडत नाही कारण ते धोकादायक आहे. सत्य लपवण्यासाठी, खोटे लपवण्यासाठी ते लोकांची हत्या करायला तयार असतात. टीप: जर मी "अपघातात" किंवा "संशयास्पद परिस्थितीत" मरण पावले किंवा "माझ्या गळ्यात फास असेल" किंवा "माझ्या औषधांचा ओडी (ओव्हर डोज्ड)" यापैकी काहीही केले तर हे जाणून घ्या अपघात किंवा आत्महत्या आहे.
मी आत्महत्याग्रस्त आहे, होय. पण मी पुन्हा तसा प्रयत्न करणार नाही अशी शपथ घेतली आणि या वेळी आत्महत्या होणार नाही, हे नक्की.
माझ्या #truekelfieans जर तुम्ही माझ्या मृत्यूची बातमी वाचली तर त्याचा अर्थ काय ते तुम्हाला माहीत आहे. ।।जय हिंद।। ।वंदेमातरम् ।भारत माता की जय।
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.