सध्या सर्वत्र सोशल मीडियावर तमन्ना भाटियाच्या 'आज की रात' (Aaj Ki Raat Song ) गाण्याची हवा पाहायला मिळत आहे. अनेक लोक या गाण्यावर रिल्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या गाण्यासोबतच प्रेक्षकांना तमन्नाचा डान्स देखील आवडला आहे. मात्र आता 'आज की रात' हे गाणे एका वेगळ्या ट्विस्टने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'आज की रात' हे हिट गाणे मराठी गायिका वैशाली सामंतने (Vaishali Samant) मराठी भाषेत गायले आहे. तेच ताल आणि तेच सूर फक्त गाण्यांची भाषा वेगळी पाहायला मिळत आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर हवा पाहायला मिळत आहे. वैशालीने आपल्या अनोख्या शैलीमध्ये हे सुपरहिट गाणे गायले आहे. जे चाहत्यांना भलतेच आवडले आहे.
'आज की रात' हे गाणे 'स्त्री 2' चित्रपटातील आहे. या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) जबरदस्त डान्स केला आहे. या डान्सची चर्चा आजही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 'स्त्री 2' चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव हे पाहायला मिळत आहेत. 'स्त्री 2' हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. 'आज की रात' हे गाणे मधुवंती बागची आणि दिव्या कुमार यांनी गायले आहे.
मराठीतील सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंतने 'आज की रात' या 'स्त्री 2' चित्रपटातील हिंदी गाण्याचे मराठी भाषेत डबिंग केले आहे. आपल्या गाण्याचे व्हिडीओ वैशालीने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्यावर तिचे चाहत्यांकडून खूप कौतुक होताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना वैशाली सामंतचा डबिंगचा प्रयोग भलताच आवडला आहे. वैशाली सामंतच्या या मराठी गाण्याचे नाव 'आजची रात्र' असे आहे.
वैशाली सामंत प्रसिद्ध संगीतकार, गीतकार आहे. तिने संगीत क्षेत्रात आपली ओळख बनवली आहे. वैशाली नेहमीच आपल्या आवाजाने चाहत्यांना वेड लावते. वैशाली सामंतने आजवर अनेक मोठ्या चित्रपटांसाठी गाणे गायले आहे. तसेच वैशालीने अनेक गाण्याचे शो जज देखील केले आहेत. आजवर वैशाली सामंतने मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, भोजपुरी, तमिळ यांसारख्या अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.