Urvashi Rautela  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Urvashi Rautela : "शाहरुख खाननंतर मीच...", उर्वशी रौतेलाने थेट किंग खानसोबत केली स्वत:ची तुलना

Urvashi Rautela Compare Herself With Shah Rukh Khan : उर्वशी रौतेलाने शाहरुख खानसोबत स्वत:ची तुलना केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कायम तिच्या लूक आणि वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत असते. तिने आजवर अनेक हिट गाणी केली आहेत. नुकतेच उर्वशी रौतेला पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने स्वत:ची तुलना चक्क बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानशी (Shah Rukh Khan) केली आहे. ती नेमका काय म्हणाली, जाणून घेऊयात. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एका मिडिया मुलाखतीत उर्वशीने आपल शाहरुख खाननंतर 'बेस्ट प्रमोटर' असल्याचे सांगितले आहे. मुलाखतीत तिला विचारले की, "लोक तुझ्यावर सेल्फ ऑब्सेस असल्याचा आरोप करतात. याला तु कशा पद्धतीने सामोरे जातेस?" यावर उत्तर देत उर्वशी म्हणाली की, मी माझ्या कामात असते. पण जर लोक असे म्हणत असतील तर लोक असेही म्हणतात की, शाहरुख खाननंतर प्रमोशनच्या बाबतीत उर्वशी रौतेला ही सर्वोत्तम प्रमोटर आहे."

पुढे उर्वशी म्हणाली की, " म्हणून हॉलिवूड निर्मात्यांनी 'रीचर' सीझन ३साठी माझ्याशी संपर्क साधला. प्रमोटर म्हणून आपण कलाकारांनीच चित्रपटाचे प्रमोशन केले नाही तर कोण करणार? 'डाकू महाराज' हा चित्रपट 2025 चा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. उर्वशी रौतेलाचे हे वक्तव्य आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

उर्वशी रौतेलाचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 72.6 मिलियन फॉलोअर्स आहे. ती सोशल मीडियावर कायम आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचा 'डाकू महाराज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली आहे. उर्वशी रौतेलाचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी आतुर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT