Gautami Patil : "पिक्चरला गर्दी करा…", गौतमी पाटीलची गुलीगत सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट

Suraj Chavan Zapuk Zupuk Movie : सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरजसाठी नृत्यांगना गौतमी पाटीलने एक खास पोस्ट केली आहे.
Suraj Chavan Zapuk Zupuk Movie
Gautami PatilSAAM TV
Published On

सध्या 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणची (Suraj Chavan ) चर्चा पाहायला मिळत आहे. सूरजचा 'झापुक झुपूक' ( Zapuk Zupuk Movie ) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सूरज चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटात सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याचा 'गुलीगत पॅटर्न' पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. सध्या सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात आता नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) देखील सूरजसाठी खास पोस्ट केली आहे.

गौतमी पाटीलने सूरजसाठी खास पोस्ट करून त्याच्या आगामी चित्रपट 'झापुक झुपूक'साठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. ज्यात ती 'झापुक झुपूक' गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ तिने मेकअप रूममध्ये बनवला आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी गौतमीने 'झापुक झुपूक' चित्रपटाला भरपूर प्रेम देण्याचे आणि 'झापुक झुपूक' गाण्यावर रील बनवण्याचे आव्हान चाहत्यांना दिले आहे.

गौतमीने या व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "२५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या तुझ्या "झापुक झुपूक" पिक्चरसाठी खूप खूप शुभेच्छा सूरज...आता सगळ्यांनी सूरजच्या 'झापुक झुपूक' या गाण्यावर नक्की रील्स बनवा..! एकदम गोलीगत...आणि हो पिक्चर ला गर्दी करा…" गौतमीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि सूरजसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

गौतमी पाटील आता लवकरच 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग शोमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तिचे छोट्या पडद्यावर हे दमदार पदार्पण असणार आहे. सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती काम आपल्या लूकचे आणि कार्यक्रम संबंधित अपडेट चाहत्यांसोबत इन्स्टाग्राम शेअर करत असते.

Suraj Chavan Zapuk Zupuk Movie
Tamannaah Bhatia : 'विजय' नाव घेताच तमन्ना भाटिया लाजत लाजत हसली, म्हणाली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com