Bollywood Actress Google
मनोरंजन बातम्या

Bollywood Actress: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं; डिलेव्हरी बॉयने शिवीगाळही केली, नेमकं प्रकरण काय?

Bollywood Actress Controversy: बॉलीवूडच्या अभिनेत्रीने डिलिव्हरी बॉयवर उद्धट वर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला. हा वाद नेमका कशामुळे झाला? याबद्दल सविस्तर हकिकत दिने सांगितली.

Sakshi Sunil Jadhav

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिवा अरोरा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटात तिने महत्वाची भुमिका पार पाडली होती. तर आता तिच्या चर्चेचे कारण हे चित्रपटातली काम नसून तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग आहे. हा प्रसंग खूप गंभीर आहे. एका डिलिव्हरी एजंटचा वागण्यावरुन हे प्रकरण वाढत गेले आहे. नेमकं काय घडलं याबद्दल रिवा अरोरा हिने एका मुलाखतीत सविस्तर सांगितलं.

रिवा अरोराच्या म्हणण्यानुसार, २६ एप्रिल रोजी दुपारी जवळपास साडेतीनच्या वेळेस ब्लिंकिटचा एक डिलिव्हरी बॉय तिच्या घरी ऑर्डर घेऊन आला होता. पण सुरुवातीपासूनच त्याची वागणूक उद्धट आणि अयोग्य असल्याचा आरोप रिवाने केला आहे. तिने शांतपणे त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यावेळे तिच्या आईनेही समजूतदारपणे विषय मिटवण्याचा प्रयत्न केला, तरीही डिलिव्हरी बॉयचा राग आणि चुकीचं वागणं वाढत चाललं होतं.

रिवाने सांगितले की, हा वाद पुढे आणखी वाढला जेव्हा तिच्या बहिणीची त्या डिलिव्हरी बॉयसोबत लिफ्टमध्येच भेट झाली. तेव्हाही तो सतत रागाच्या भरात शिवीगाळ करत होता. कुटुंबीयांनी सतत समजावून सुद्धा त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. उलट तो अजूनच अपमानास्पद आणि घाणेरडे शब्द वापरत बोलत होता.

जवळपास ३० ते ४० मिनिटं ही भांडणं सुरु होती. नंतर तो एजंट तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना रिवाच्या कुटुंबीयांनी त्याला थांबवलं. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती समोर आली आहे. याच घटनेमुळे रिवा अरोरा सोशल मीडियाचा चर्चेचा विषय ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

Chanakya Niti: या ४ ठिकाणी दान केल्याने वाढते श्रीमंती, चाणक्यनितीतले महत्त्वाचे विचार नक्कीच वाचा

SCROLL FOR NEXT