Urfi Javed Ravan Look Shared On Dussehra Instagram
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Ravan Look: उर्फीचा नवा ‘रावण लूक’ पाहिलात का?, नेटकऱ्यांनी ‘शुर्पणखा’ म्हणत केलं ट्रोल...

Urfi Javed New Look: उर्फीने दसऱ्याचे औचित्यसाधत एक भन्नाट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Chetan Bodke

Urfi Javed Ravan Look Shared On Dussehra

टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Actress Urfi Javed) कायमच आपल्या नव्या आणि हटक्या फॅशनमुळे चर्चेत राहते. सोशल मीडियावर चर्चेत राहण्यामागील कारण म्हणजे तिची अतरंगी आणि क्रिएटिव्ह ड्रेसिंग स्टाईल. उर्फीने फार कमी वेळेमध्ये स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे. उर्फीने एका अजब स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधलेय. दसऱ्याचे औचित्यसाधत उर्फीने एक विचित्र स्टाईल केली आहे.

दसऱ्याच्या निमित्ताने उर्फी जावेदने सोशल मीडियावर रावणाचा लूक केला आहे. सध्या तिचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उर्फीच्या ह्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. कायमच वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करुन फॅशनची हौस पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करते. गेल्या काही दिवसांपूर्वी उर्फीने चाहत्यांसोबत, सिगारेटच्या तुकड्यांपासून, ब्लेड पासून, फुलांपासून, टिश्श्यु पेपर, सिमकार्ड आणि अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तिने फॅशन केली आहे.

उर्फीने दसरा स्पेशल लूक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. उर्फीने त्या व्हिडिओमध्ये जो गॉगल डोळ्याला लावला आहे त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या या लूकवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिली आहे. तिची फॅशन पाहून नेटकरी म्हणतात, तू रावणाचा का गॉगल चोरलास गं ?, तर आणखी एक युजरने तिच्या फॅशनचे आणि क्रिएटिव्हीटीचे कौतुक केले आहे. उर्फी तुझा गॉगल पाहून रावणाची डोकेदुखी वाढली असती. अशी एका भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने तिची थेट शुर्पणखेसोबतच तुलना केली आहे. उर्फीच्या ह्या व्हिडीओवर ७८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. (Trolled)

उर्फी काल बांद्रातील पोलीस स्टेशन बाहेर पापाराझींच्या कॅमेऱ्यात स्पॉट झाली होती. बांद्रा पोलीस स्टेशन बाहेरील उर्फीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. उर्फी जावेद विरोधात आक्षेपार्ह्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या करिताच उर्फी पोलीस स्टेशन बाहेर स्पॉट झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT