देशाचं सौरक्षण करण्यास दिवसरात्र जीवाची पर्वा न करता, डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या सैनिकवर्गाबाबद्दल फार कमी बोललं जातं. विशेषतः प्रजासत्ताक दिन वा स्वातंत्र्यदिन असतांनाच देशासाठी बलिदान दिलेल्यांची आठवण काढली जाते. पण इतर दिवशी या महान कार्य करणाऱ्या मायबाप सैनिकवर्गाबद्दल फार कमी बोललं जातं. अशाच एका शुरवीर सैनिकाची गाथा प्रेक्षकांना ‘बटालियन ५०’मधून (Battalion 50) रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
जून महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकतंच दसऱ्याचे निमित्त साधत निर्मात्यांनी सोशल मीडियावर ‘बटालियन ५०’चा मोशन पोस्टर शेअर केले आहे. 'कीर्ती वराडकर फिल्म्स' प्रस्तुत, प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.
‘बलोच’च्या घवघवीत यशानंतर कीर्ती वराडकर आता ‘बटालियन ५०’ या चित्रपटासाठी सज्ज झाल्या आहेत. देशाप्रतीची भावना आणि आदर कीर्ती वराडकर ‘बटालियन ५०’या चित्रपटातून घेऊन येत आहेत. चित्रपटाच्या मोशन पोस्टर पाहता अंगावर काटे उभारले आहेत. शरीरातील रक्त सळसळू लागलं आहे, इतिहासातल्या या शूरवीरांची गाथा जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. मराठमोळ्या मातीमध्ये शून्यापासून प्रयत्न करून हे सैनिक कसे घडत जातात यांची कथा दाखवण्यात आली आहे.
‘बलोच’फेम अभिनेता गणेश शिंदे चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अद्याप चित्रपटातील इतर कलाकार गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून लवकरच चित्रपटातील इतर कलाकारांची नाव समोर येणार आहेत. कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत ‘बटालियन ५०’च्या दिग्दर्शनाची धुरा प्रीतम एस के पाटील यांनी सांभाळली आहे. तर महेश विनायक कुलकर्णी, किंग प्रोडक्शन आणि तुषार कापरे पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.