Battalion 60 Announcement: शूर वीर नायकाची कथा मांडणार ‘बटालियन ६०’, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Battalion 60 Poster: मराठमोळ्या मातीत तयार झालेल्या एका शूर वीर नायकाची कथा ‘बटालियन ६०’ चित्रपटात मांडण्यात येणार आहे.
Battalion 60 Announcement
Battalion 60 AnnouncementInstagram
Published On

Battalion 60 Marathi Film Announcement: आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास लाभला आहे. महाराष्ट्राच्या मातीतल्या वीर पुत्रांनी या इतिहासाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे, याचे अनेक धडे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. हे वीर महाराष्ट्राच्या मातीतून कसे घडतात, त्यांचा तो प्रवास जाणून घेण्यासाठी लवकरच रुपेरी पडदा गाजवायला एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘किंग प्रोडक्शन’ आणि आणि तुषार कापरे पाटील प्रस्तुत हा चित्रपट असून दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित ‘बटालियन ६०’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Battalion 60 Announcement
Team India Squad Announced: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! मराठमोळ्या रहाणेला मिळाली मोठी जबाबदारी

चित्रपटाबद्दल थोडक्यात बोलायचं तर, मराठमोळ्या मातीत तयार झालेल्या एका शूर वीर नायकाची कथा या चित्रपट मांडण्यात येणार आहे. शून्यापासून प्रयत्न करून हे शूर वीर कसे घडत जातात याचं हुबेहूब वर्णन या चित्रपटात करण्यात आलं आहे. नुकताच या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या पोस्टरमध्ये पाठमोरा वीर पाहायला मिळतोय, तसेच बॉर्डरवर हातात बंदूक घेऊन सैनिक दिसत आहेत.

चित्रपटाच्या कथेत प्रेक्षकांना एका शूर सैनिकाची गाथा पाहायला मिळणार आहे. पाठमोरी असलेली व्यक्ती म्हणजे ‘बलोच’ फेम अभिनेता गणेश शिंदे आहे. अद्याप चित्रपटातील मुख्य कलाकाराचेच नाव समोर आले असून इतर कलाकारांची नावे गुलदस्त्यात आहेत. लवकरच चित्रपटातील इतर कलाकारांची नाव समोर येणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांनी सांभाळली असून ‘किंग प्रोडक्शन’ आणि तुषार कापरे पाटील यांनी या चित्रपटाच्या निर्मिती केली आहे.

Battalion 60 Announcement
Adipurush 8th Day Collection: बिगबजेट असलेल्या ‘आदिपुरुष’ची स्पेशल ऑफर सपशेल अपयशी, आठव्या दिवशी केली इतकी कमाई...

‘बटालियन ६०’ हा चित्रपट एका शूर सैनिकाची कथा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. देशप्रेमींसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणीच असेल यात शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com