Adipurush 8th Day Collection: बिगबजेट असलेल्या ‘आदिपुरुष’ची स्पेशल ऑफर सपशेल अपयशी, आठव्या दिवशी केली इतकी कमाई...

Adipurush Box Office Collection: चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या फारच तुटपुंजी कमाई करताना दिसताना आहे.
Adipurush 8th Day Box Office Collection
Adipurush 8th Day Box Office CollectionTwitter
Published On

Adipurush 8th Day Box Office Collection: ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या फारच तुटपुंजी कमाई करताना दिसताना आहे. एका आठवड्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८व्या दिवशी कशी कमाई केली आहे, चला तर जाणून घेऊया...

Adipurush 8th Day Box Office Collection
Kangana Ranaut Upcoming Movie Emergency : कंगना रनौतच्या बहुप्रतीक्षित 'इमरजेंसी' चित्रपटाची रिलीज डेट आऊट

चित्रपटाच्या संवादांवर सर्वच स्तरातून विरोध होत असताना निर्मात्यांनी संवादात बदल केला आहे. चित्रपट प्रदर्शनावेळी निर्मात्यांनी चित्रपटाच्या किंमतीत बरीच वाढ केली होती, सर्वच स्तरातून विरोध सहन केल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाची किंमत देखील कमी केली आहे. अनेक मार्केटिंग स्ट्रेटेजी वापरून देखील चित्रपटाच्या कमाईवर फारसा परिणाम झालेला नाही. ८व्या दिवशी देखील चित्रपटाने फारच कमी कमाई केली आहे.

सॅकनिल्क या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८ व्या दिवशी ३.२५ कोटींची कमाई केली आहे. सोबतच, ८ दिवसांत चित्रपटाने भारतात एकूण कमाई २६३. १५ कोटी रुपयाची कमाई केली. यापूर्वी, सातव्या दिवशी, चित्रपटाने ४.८५ कोटी कमावले होते, ८व्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे तर, हिंदीमध्ये २.९ कोटी आणि तेलुगूमध्ये १.७ कोटी कमावले होते. मल्याळम ३ लाख, तमिळ आणि कन्नड भाषेत चित्रपटाने २ लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई ही फारच तुटपुंजी कमाई आहे.

Adipurush 8th Day Box Office Collection
Anil Kapoor Celebrates 40 In Bollywood : मला तुमचे सहकार्य हवे आहे ... इंडस्ट्रीत ४० वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनिल कपूरचे भावुक आवाहन

दुसरीकडे, बहुचर्चित आणि बिगबजेट असलेल्या या चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने फक्त सहा दिवसांचाच जगभरातील कमाईचा आकडा शेअर केला. ‘आदिपुरुष’ चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ४१० कोटी रुपयांची कमाई केली. टी-सीरीजने आपल्या ट्विटर हँडलवर ७व्या आणि ८व्या दिवसाची जगभरातील आकडेवारी जाहीर केलेली नाही.

‘आदिपुरुष’ चित्रपटासोबतच इतरही चित्रपटांवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटात सीतेला भारताची कन्या म्हणण्यावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, आता इतर बॉलिवूड चित्रपटांवरील बंदी उठवण्यात आली असली, तरी ‘आदिपुरुष’ वरील बंदी कायम आहे.

‘रामायण’वर आधारित असलेल्या चित्रपटातील संवाद आणि दृश्यांवरही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. अनेक सेलिब्रिटींनी देखील चित्रपटाविरोधात आपली भूमिका मांडली होती. यादरम्यान रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये राम,सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांनी देखील चित्रपटावर आपला राग व्यक्त केला. त्यांनी चित्रपटाला रामायणातील सर्वात मोठा विनोद म्हटले असून क्रिएटिव्हीटीच्या नावाखाली निर्मात्यांनी काय केले? यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com