Urfi Javad Saam Tv
मनोरंजन बातम्या

उर्फी जावेदच्या 'या' व्हिडिओमुळं ट्रोल नव्हे, तर चक्क होतोय कौतुकाचा वर्षाव

उर्फी जावेदने तिचा नवीन व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उर्फी जावेद(Urfi Javed) हे नाव सध्या जबरदस्त चर्चेत असतं. अतरंगी फॅशनमुळं तर उर्फी जावेद नेहमीच ट्रोल होत असते. विचित्र फॅशनमुळं चर्चेत आणि नेटकऱ्यांचा रोष ओढवून घेणारी उर्फी आता नव्या व्हिडिओमुळं चर्चेत आली आहे. यावेळी तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं नाही. तर, चक्क तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. उर्फीचा हा व्हिडिओ पाहून काहींनी उपरोधिक टोला लगावला असला तरी, शेकडो फॉलोअर्सनं तिचं तोंडभरून कौतुकही केलं आहे.

अभिनेत्री उर्फी जावेदला काहीतरी वेगळी स्टाईल करून चर्चेत राहायला नेहमीच आवडतं. उर्फी सोशल मीडियावर(Social Media) खूपच सक्रिय असते. उर्फी तिच्या अतरंगी पोशाखातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. यावर उर्फीला अनेक लाईक्स, कमेंट्स येतात. चाहते उर्फीच्या फॅशनस्टाईलचं कौतुक करतात. तर अनेकदा उर्फीला ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. यात कौतुक कमीच, पण ट्रोल जास्त केलं जातं. आता देखील उर्फी जावेद प्रसिद्धीझोतात आली आहे. उर्फी जावेदच्या या कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे.

उर्फी जावेदने तिचा नवीन व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उर्फी जावेदने तिच्या इस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फी पारंपारिक वेशामध्ये दिसते आहे. उर्फीने कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. तिने मॅंचिग कानातल्या आणि मेकअपसह लूक पूर्ण केला. उर्फीचा हा संस्कारी लूक खूपच क्यूट दिसतो आहे. याच वेळेस उर्फी संस्कृतमध्ये गणेश वंदना करत आहे. पार्श्वसंगीत सुरू आहे, पण त्याचबरोबर उर्फीही गात आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. उर्फीची ही स्टाइल सोशल मीडिया यूजर्सला खूप आवडली आहे.

व्हिडिओ शेअर करत उर्फीने "गणपती बाप्पा मोरया!! इंडियन आयडॉलसाठी हे माझे ऑडिशन नाही, ज्याला जज व्हायचे असेल त्याने कोर्टात जावे! मी गाऊ शकत नाही आणि मला ते माहीत आहे," अशी कॅप्शन देत ट्रोलर्सना न कळत इशाराच दिला आहे. उर्फीला या व्हिडिओवर ट्रोलिंग अपेक्षित होती. मात्र तसं झाले नाही. तर नेटिझन्स तिच्या या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी तिने केलेल्या या व्हिडिओवर उर्फीचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT