मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख(Shahrukh Khan) हा 'जवान'(Jawan) आणि 'पठाण' या चित्रपटांतून चार वर्षांनी रूपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अलीकडेच त्याने 'रॉकेट्री' आणि 'लाल सिंग चड्ढा' यांसारख्या चित्रपटांमध्ये कॅमिओ केली आहे. आता चाहत्यांना त्याला 'डॉन 3' मध्ये पाहायचे आहे. मात्र शाहरुखने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर आले आहे. नुकतीच त्याला या चित्रपटाची ऑफर आली आणि ती त्याने रिजेक्ट केली आहे. शाहरुखला चित्रपटाच्या स्क्रिप्टवर पूर्णपणे विश्वास नसल्यामुळे त्याने चित्रपट करण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.
माहितीनुसार, सुपरस्टार शाहरुख खानला 'डॉन 3'ची ऑफर आली आहे आणि त्याने ती नाकारली आहे. शाहरूखला 'डॉन ३' ची स्क्रिप्ट आवडली नाही असं नाही, मात्र शाहरुखला स्क्रिप्टविषयी पूर्णपणे खात्री नसल्याने तूर्तास त्याने नकार दिला आहे. त्याला माहीत आहे की, डॉन हे आयकॉनिक रोल आहे. आणि त्याला तो साकारायचा आहे. मात्र शाहरूखला स्क्रिप्टबद्दल खात्री वाटत नाही तोपर्यंत चित्रपटाविषयीचा कोणताही निर्णय घेणार नाही.
सध्या मोठ्या बॅनरचे आणि दिग्गज स्टार असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले आहेत. चित्रपटांना बहिष्काराचा सामना करावा लागतो आहे. अक्षरक्ष: बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे अशातच सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची कामगिरी निराशाजनक होत असताना नवीन प्रोजेक्टवर सही करण्यापूर्वी त्याला अनेक वेळा विचार करावासा वाटतो. यामुळेच शाहरूख खानने नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.
सध्या शाहरूख फरहान अख्तरच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. लवकरच सुपरस्टार शाहरुख 'डॉन 3' चित्रपटाबाबत आंनदाची बातमी देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. चाहतेही शाहरूखला डॉनमध्ये पाहण्यास उत्सुक आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खानचे तीन चित्रपट आहेत. तो 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात तो एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात शाहरूखसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत. त्याचवेळी तो राजकुमार हिरानीच्या 'डंकी' आणि अॅटलीच्या 'जवान'मध्ये झळकणार आहे. पुढच्या वर्षी शाहरूख खानचे तिनही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.