Vishay Hard Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vishay Hard Trailer : प्रेम सॉफ्ट असलं तरी इथं 'विषय हार्ड' होणार; चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

Vishay Hard Trailer Released : प्रेम, प्रेमाची 12 वर्ष याचा आयाम घेऊन येणारा 'विषय हार्ड 'हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अपूर्वा कुलकर्णी- साम टिव्ही

प्रेम, प्रेमाची 12 वर्ष याचा आयाम घेऊन येणारा 'विषय हार्ड 'हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात प्रेमातल्या बारा वर्षातील प्रसंग हे अतिशय विनोदी, रंजन आणि कलात्मक पद्धतीनं मांडण्यात आले आहे. या चित्रपटामधून प्रेक्षकांना मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या रंगांची सफर घडणार आहे. या चित्रपटात पर्ण पेठे ही नायिकेच्या भुमिकेत तर नवखा कलाकार सुमित हा नायकाच्या भुमिकेत प्रथमच पहायला मिळणार आहे.

या चित्रपटातील गीतांचे लेखन नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी यांनी केलं आहे. तर सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन केलंय. संदीप गावडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.... टीझर आणि गाणी यापूर्वीच प्रदर्शित झालेली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असलेलं पहायला मिळतय. अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणारा आहे...

या चित्रपटाच्या प्रेमकथेत नायक-नायिकेचं 12 वर्षापासून एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे.. पण ते प्रेम वाचवायला त्यांच्या कडे फक्त 5 तास आहे.. आणि त्या पाच तासामध्ये विचित्र संकंटाना तोंड देताना त्यांचा होणारा गोंधळ अतिशय मनोरंजक पद्धतीनं या चित्रपटात मांडण्यात आल्याचं ट्रेलरवरून दिसून येतय. त्यामुळं 5 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'विषय हार्ड' या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT