Winter Water Intake: हिवाळ्यात पाणी कमी पिताय? किडनी आणि हृदयावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या रोज किती पाणी प्यावे

Winter Water Intake: हिवाळ्यात तहान कमी लागल्यामुळे पाणी पिणे कमी होते. यामुळे किडनी, हृदय आणि मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या दररोज किती पाणी प्यावे आणि का.
Winter Water Intake
Winter Water IntakeSaamTv
Published On: 

Winter Water Intake: हिवाळा सुरू झाला की अनेकांच्या पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात सतत तहान लागत असल्याने आपण वारंवार पाणी पितो. मात्र, थंडीच्या दिवसांत तहान कमी लागते आणि त्यामुळे अनेकजण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास किडनी आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर थकवा, चिडचिड आणि एकाग्रता कमी होण्याचाही त्रास जाणवू शकतो.

हिवाळ्यात कमी तहान का लागते?

थंडीच्या दिवसांत घाम कमी येतो. त्यामुळे शरीराला पाण्याची गरज कमी असल्याचा भास होतो. मात्र, थंड वातावरणात किडनी अधिक लघवी तयार करू शकते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यातही शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. त्यामुळे तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

पाणी कमी प्यायल्यामुळे किडनीवर होतो परिणाम

किडनीचे मुख्य काम रक्तातील घाण आणि नको असलेले पदार्थ लघवीच्या माध्यमातून शरीरातून बाहेर काढणे आहे. यासाठी शरीराला पुरेसे पाणी मिळणे आवश्यक असते. पाणी कमी प्यायल्यास किडनीच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तसेच किडनी स्टोन, मूत्रमार्गातील संसर्ग आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो.

Winter Water Intake
Eetha movie: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; 'जी जी रे जी' गाण्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

हृदयाच्या आरोग्यासाठीही पाणी महत्त्वाचे

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात अडचण निर्माण होऊ शकते. शरीरातील दाह वाढणे आणि रक्तवाहिन्या कडक होण्याचाही धोका असतो. याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यातही पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.

Winter Water Intake
Pakistani Series Ban in India: नेटफ्लिक्स इंडियावरील पाकिस्तानी वेब सीरिज वादात; भारतात बंदीसाठी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

पाणी कमी प्यायल्यास एकाग्रता कमी होते

शरीरात पाण्याची थोडी कमतरता झाली तरी त्याचा परिणाम मेंदूच्या कार्यावर होऊ शकतो. एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्तीवर परिणाम होणे, थकवा आणि मूडमध्ये बदल जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दिवसभर नियमित पाणी पिण्याची सवय लावा.

दररोज किती पाणी प्यावे?

डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार, महिलांना दररोज साधारण २.७ लिटर, तर पुरुषांना ३.७ लिटर एकूण पाण्याची गरज असते. यामध्ये अन्नातून मिळणाऱ्या पाण्याचाही समावेश आहे. एकूण पाण्यापैकी साधारण २० टक्के पाणी अन्नातून, तर ८० टक्के पेयांमधून मिळते. व्यायाम करणाऱ्या किंवा जास्त शारीरिक मेहनत घेणाऱ्या व्यक्तींना अधिक पाण्याची गरज असू शकते.

लहान मुलांनी किती पाणी प्यावे?

लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या शरीराला पाण्याची गरज बदलते. ४ ते ८ वर्षांच्या मुलांनी दररोज साधारण ७ कप पाणी प्यावे. ९ ते १३ वर्षांच्या मुलींनी ९ कप, तर मुलांनी १० कप पाणी प्यावे. किशोरवयीन मुलींना १० कप आणि मुलांना १४ कप पाणी प्यावे.