Pension Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट! सरकारचे नवे निर्देश; काय बदलणार?

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पेन्शनची कागदपत्रे जमा केल्यानंतर नवीन माहिती किंवा थकबाकी समोर आल्यास काय करावे?
Pension Rules
Pension Rules saam tv
Published On: 

निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन हा सर्वात मोठा आर्थिक आधार असतो. त्यामुळे पेन्शनचा हिशोब बरोबर होणे आणि पैसे वेळेवर मिळणे खूप महत्त्वाचे ठरते. पेन्शनवर केंद्र सरकारने सर्व मंत्रालये आणि विभागांना पुन्हा एकदा महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्याची पेन्शनची कागदपत्रे जमा केल्यानंतर जर अशी कोणतीही नवीन माहिती समोर आली, ज्यामुळे पेन्शनच्या रकमेत बदल होऊ शकतो, तर ती माहिती लगेचच लेखा अधिकाऱ्याला कळवावी लागेल, असे निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW) स्पष्ट केले आहे.

पेन्शनची कागदपत्रे दिल्यानंतरही कर्मचाऱ्याकडे सरकारची कोणतीही थकबाकी किंवा देय रक्कम निघाल्यास, त्याची माहिती तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला द्यावी लागेल. याबाबत २४ ऑक्टोबर २०२६ रोजी नवीन आदेश काढण्यात आला आहे. हे नियम केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, २०२१ खाली येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतील. कागदपत्रे सादर केल्यानंतरही हा नियम पाळावा लागेल. यातून सरकारने दोन महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

पहिला मुद्दा :

कर्मचाऱ्याची पेन्शनची कागदपत्रे लेखा अधिकाऱ्याकडे पाठवल्यानंतरही जर पेन्शनच्या रकमेवर परिणाम होईल अशी एखादी माहिती समोर आली, तर विभागाने ती लगेच नोंदवून घ्यावी. पेन्शनच्या हिशोबाच्या संबंधित कोणतीही माहिती नंतर मिळाल्यास त्याकडे दुर्लक्ष चालणार नाही. ती माहिती लेखा अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यालयप्रमुखाची राहील.

दुसरा मुद्दा :

कर्मचाऱ्याच्या शासकीय देय रकमांची माहिती आधीच दिली असली, पण नंतर आणखी काही देणी असल्याचे लक्षात आले, तर त्याबद्दलही संबंधित विभागाला कळवावे लागेल. पेन्शनची कागदपत्रे पाठवून विभागाची जबाबदारी संपत नाही. नंतर समोर येणारी प्रत्येक महत्त्वाची माहिती संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

रिटायरमेंटनंतर मिळणारी दर महिन्याची पेन्शन कर्मचाऱ्याच्या जगण्याचा मुख्य आधार असते. नोकरीचा काळ आणि इतर महत्त्वाच्या नोंदींवरून पेन्शनची रक्कम ठरते. कागदपत्रे दिल्यानंतर एखादी नवी माहिती समोर आली आणि ती अधिकाऱ्यांना कळवली नाही, तर पेन्शनचा हिशोब चुकू शकतो. कोणतीही माहिती राहून जाऊ नये आणि लेखा अधिकाऱ्याकडे सर्व नोंदी अचूक राहाव्यात, हा या नव्या नियमाचा मुख्य हेतू आहे.

Pension Rules
नोकरदारांसाठी मोठी अपडेट! EPFO मध्ये अतिरिक्त रक्कम भरण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या काय होऊ शकतो बदल

नवीन अर्ज भरावा लागेल का?

नाही. या नव्या सूचनेनुसार पेन्शनधारकांना कोणताही नवा अर्ज किंवा जास्तीचा फॉर्म भरण्याची गरज नाही. यात फक्त आधीच्याच नियमांचे स्पष्टीकरण दिले आहे. पेन्शनधारकांना स्वतः कोणतीही नवीन प्रक्रिया करायला सांगितलेले नाही. पेन्शनची जास्तीची माहिती लेखा अधिकाऱ्याला देण्याची जबाबदारी संबंधित विभाग आणि कार्यालय प्रमुखांची असेल.

Pension Rules
Fact Check : राज्यातील जिल्हा परिषदेत शिपाई भरती, पगार २५ हजार; नेमकं सत्य काय? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.