Bigg Boss OTT 3 : अरमान मलिकची दोन बायकांमुळे झाली फजिती, २ लग्न करणाऱ्या युट्यूबरच्या पत्नीने दिला चाहत्यांना कानमंत्र

Armaan Malik And Payal Ambani News : पायल मलिकने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अरमान मलिकच्या दोन लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे.
bigg boss ott 3
Armaan Malik And Payal Ambani NewsSaam TV

'बिग बॉस ओटीटी ३' फेम पायल मलिक हिचा एका आठवड्यातच बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. रविवारीच ती घराबाहेर आली असून तिने काही मुलाखत दिली आहे. सध्या पायल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पायल हिचा पती युट्यूबर अरमान मलिक याने पायल हिला घटस्फोट न देता कृतिका हिच्यासोबत लग्न केलं. अरमानने दोन लग्न केल्यामुळे त्याला बिग बॉसच्या घरात आल्यानंतर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पायल मलिकने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अरमान मलिकच्या दोन लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे.

bigg boss ott 3
प्रभास- दीपिकाच्या 'Kalki 2898 AD'ची छप्परतोड कमाई; शाहरुखच्या 'Jawan'लाही मागे टाकलं, पहिल्या आठवड्याला किती कमावले?

शोमधून बाहेर आल्यानंतर पायल मलिकने अरमानच्या दोन लग्नाबद्दल भाष्य केले आहे. ती म्हणाली, "लोकं दोन लग्नांना मान्यता देत नाही आणि आयुष्यात केव्हा करतही नाही. आम्ही अनेकदा ब्लॉगमध्ये दोन लग्न केल्याच्या चुका सांगितल्या आहेत. आम्ही दोन लग्न केले, तुम्ही करू नका. त्यासोबतच अरमानकडूनही दोन लग्न केल्याच्या चुका झालेल्या आहेत. आणि त्याने अनेकदा आपली चुक मान्यही केलेली आहे. आमच्या तिघांमध्येही अनेकदा टोकाचे वाद झालेले आहेत. पण आम्ही एकत्र चर्चा करून तो प्रोब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करायचो. जगातली कोणतीही गोष्ट आम्हाला कधीच वेगळं करु शकत नाही. " अशी प्रतिक्रिया तिने दिली.

पायल आणि कृतिका एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे अरमान– कृतिका यांच्यामध्येही चांगली मैत्री झाली. पण जेव्हा अरमान– कृतिका यांनी लग्न केलं तेव्हा पायल हिला मोठा धक्का बसला. पायल मलिकबद्दल सांगायचे तर, इन्स्टाग्रामवर पायल मलिकच्या फॅन्सची संख्या फार मोठी आहे. पायल कायम सोशल मीडियावर स्वतःचे आणि फॅमिलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते नेहमीच पायलच्या सोशल मिडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

bigg boss ott 3
Salman Khan Threat Case : सलमान खानला मारण्यासाठी थेट पाकिस्तानमधून मागवली हत्यारे? आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com