Pawan Kalyan On Allu Arjun : ४ डिसेंबर रोजी, 'पुष्पा 2' चित्रपटाचा प्रीमियर हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अल्लू अर्जुन देखील उपस्थित होता. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचा 9 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी त्यांचे मत मांडले असून यावेळी अभिनेता अल्लू अर्जुनची बाजू घेतली आहे.
याबाबत सोमवारी पवन कल्याण यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “काही लोकांचे म्हणणे आहे की तेलंगणा सरकारने या प्रकरणी मवाळ भूमिका घ्यायला हवी होती, परंतु कायद्याच्या दृष्टीने कोणालाही प्राधान्य दिले जाऊ शकत नाही. कायदा हेच सांगतो.” माझ्याकडून काही चूक झाली तर मला शिक्षाही झालीच पाहिजे, अशी घोषणा मी विधानसभेत केली आहे, असे ते म्हणाले.
अल्लू अर्जुनच्या समर्थनार्थ...
पवन कल्याणने अल्लू अर्जुनचा बचाव करत म्हणाले, “या प्रकरणात संपूर्ण दोष हा चित्रपटाच्या नायकावर टाकला गेला, त्याला एकट्याला लक्ष्य केले गेले. मला हे योग्य वाटले नाही. नंतर जी परिस्थिती उद्भवली ती हाताळण्यासाठी कोणीही योग्य मार्गदर्शन केले नाही आणि एकदा गुन्हा दाखल झाला की तुम्ही पोलिसांची चौकशी करू शकत नाही.
ही चूक निदर्शनास आणून दिली
यावेळी पवन कल्याण यांनी पुष्पा २ च्या निर्मात्यांच्या चुकीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “त्यांनी दुसऱ्याच दिवशी पीडितेच्या घरी जायला हवे होते. निर्माता, दिग्दर्शक किंवा टीममधले आणखी कोणीतरी तिथे जाऊन त्यांचे सांत्वन करायचे आणि त्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत असल्याचे त्यांना सांगणे त्यांना धीर देणे गरजेचे होते. त्यांनी ते केले का? असा प्रश्न देखील यावेळी पवन कल्याण यांनी उपस्थित केला.
संध्या थिएटर प्रकरणात अल्लू अर्जुनलाही अटक करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. अल्लू अर्जुनने पत्रकार परिषदेत या प्रकरणावर आपली भूमिका मांडली होती आणि आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. माझ्या चारित्र्यावर ज्याप्रकारे प्रश्न उपस्थित केले गेले त्यामुळे मला खूप झाले, असे तो म्हणाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.