Twinkle Khanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

Twinkle Khanna: 'आजकालची मुलं कपड्यांप्रमाणे पार्टनर बदलतात...'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विधानावर नेटकरी संतप्त

Twinkle Khanna: ट्विंकल खन्नाने अलीकडेच तिच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या टॉक शोमध्ये आजच्या मुलांच्या रिलेशनशिपबद्दल एक वादग्रस्त विधान केल आहे. यामुळे सोशल मिडीयावरुन तिच्यावर टीका होत आहे.

Shruti Vilas Kadam

Twinkle Khanna: ट्विंकल खन्ना गेल्या काही काळापासून तिच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या टॉक शोमुळे चर्चेत आहे. ती काजोलसोबत या शोचे होस्ट करते. या शोमध्ये विविध सेलिब्रिटींना आमंत्रित करुन त्यांच्यासोबत गप्पा मारल्या जातात. अलीकडेच, करण जोहर आणि जान्हवी कपूर यांच्या एका एपिसोडमध्ये फसवणूकीवर भाष्य केल्यामुळे ट्विंकल खन्नाला ट्रोल करण्यात आले होते. आता, नवीनतम एपिसोडमध्ये, तिने जनरेशन झेडबद्दल एक कमेंट केली आहे. यामुळे नेटकरी संतप्त झाले आहेत.

आजकालची मुले कपड्यांप्रमाणे पार्टनर बदलतात

फराह खान आणि अनन्या पांडे "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" च्या नवीन एपिसोडमध्ये आल्या होत्या. ट्विंकल म्हणाली की मोठी माणसे प्रेमसंबंध लपवण्यात अधिक पटाईत असतात. त्यानंतर तिने एका रॅपिड फायर सेगमेंटमध्ये म्हटले, "आजकालची मुले कपड्यांप्रमाणे पार्टनर बदलतात." त्यानंतर, ट्विंकल हिरव्या बॉक्समध्ये गेली, तर फराह खान, अनन्या पांडे आणि काजोलचे बॉक्स लाल झाले, जे ट्विंकलच्या विधानाशी असहमत नसल्याचे दर्शवते.

ट्विंकल स्वतःचा बचाव करत म्हणाली, "ही चांगली गोष्ट आहे कारण आमच्या काळात असे होते की, 'लोक काय म्हणतील? आपण हे करू शकत नाही.'" पण काजोलने म्हणाली, "मला असे वाटत नाही. आपण आजची मुले नाही." त्यानंतर ट्विंकलने स्वतःचा बचाव करताना म्हटले, "ते वारंवार जोडीदार बदलत असतात आणि मला वाटते की ही चांगली गोष्ट आहे."

ट्विंकल खन्नावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. एकाने लिहिले, "ती शेजारची आंटी आहे. जी फक्त अशा कमेंट करुननंतर सावरायच काम करते" दुसऱ्याने टिप्पणी केली, "भूतकाळ नकळत बाहेर येत आहे." दुसऱ्याने टिप्पणी केली, "ट्विंकल खन्नाशी लग्न करणे ही अक्षय कुमारची सर्वात मोठी चूक होती."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Pune : पुण्यात भयंकर हत्याकांड, बिझनेसमनने बायकोचा गळा दाबला, भट्टीमध्ये बॉडी जाळली, अन् राख....

Aditi Tatkare: अदिती तटकरे यांच्याविषयी माहित नसलेल्या या ६ गोष्टी जाणून घ्या?

धक्कादायक! भाजप आमदाराचा पाय खोलात; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, नेमकं घडलं काय?

Ratalyachi Kheer Recipe: सुट्टीच्या दिवशी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी रताळ्याची खीर

SCROLL FOR NEXT