Twinkle Khanna SAAM TV
मनोरंजन बातम्या

Twinkle Khanna : 'रात गई बात गई...'; 'फिजिकल बेवफाई'वर ट्विंकल खन्नाचं स्पष्ट मत, नेटकऱ्यांकडून होतेय ट्रोल

Twinkle Khanna On Physical Infidelity : ट्विंकल खन्नाने आपल्या 'टू मच' शोमध्ये 'फिजिकल बेवफाई'वर दिलेल्या मतामुळे चांगलीच ट्रोल होत आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

ट्विंकल खन्ना आणि काजोलचा 'टू मच' शो सध्या चांगलाच चर्चेत आहे.

नुकतेच शोमध्ये करण जोहर आणि जान्हवी कपूर आले आहेत.

शोमध्ये ट्विंकल खन्ना 'फिजिकल बेवफाई'वर आपले स्पष्ट मत मांडते, ज्यामुळे ती सध्या ट्रोल होत आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि काजोल (Kajol) सध्या त्यांच्या 'टू मच' (Too Much) या शोमुळे चांगलेच चर्चेत आहेत. या शोमध्ये रोज एक नवीन ड्रामा पाहायला मिळतो. नुकतेच या शोमध्ये करण जोहर (Karan Johar) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आले आहेत. तेव्हा सर्व छान गप्पा मारताना दिसत आहेत. तेव्हा शोमध्ये शारीरिक आणि भावनिक 'बेवफाई'वर चांगली चर्चा रंगली.

'टू मच' शोमध्ये एक खेळ असतो, ज्याला 'दिस ऑर दॅट' म्हणतात. यात शोमध्ये आलेले पाहुणे आणि होस्ट यांना सेम प्रश्न विचारला जातो आणि त्यांचे मत जाणून घेतले जाते. यात 'फिजिकल बेवफाई'पेक्षा 'इमोशनल बेवफाई' जास्त गंभीर आहे का? असा प्रश्न करण्यात आला. यात ट्विंकल, काजोल आणि करणचे एकमत होते. मात्र जान्हवी कपूरचे एकटीचे वेगळे मत होते. ट्विंकल, काजोल आणि करणच्या मते 'इमोशनल बेवफाई' ब्रेकअपसाठी मोठे कारण आहे. त्यांच्यामते 'फिजिकल बेवफाई' ही एक चूक आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करा. तर दुसरीकडे जान्हवीच्या मते, 'फिजिकल बेवफाई' म्हणजे ब्रेकअप...

जान्हवीच्या उत्तरानंतर करण म्हणतो की, "फिजिकल बेवफाईमुळे नातं तोडले जाऊ शकत नाही... " त्यावर जान्हवी बोलते, "नातं तुटतं..." त्यावर ट्विंकल बोलते की, "आपण 50 च्या दशकातले आणि ती 20 च्या दशकातली आहे. आपण जे पाहिले ते तिने पाहिले नाही. रात गई बात गई..." मात्र ट्विंकल खन्ना आता तिच्या या बोलण्यामुळे चांगलीच ट्रोल होत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही नेटकरी तिच्या मताशी सहमत नाही.

"लग्नाचा अर्थ काय?", बॉलिवूडच्या पत्नींकडे दुसरा पर्याय नसावा", "मूर्खपणा आहे हा" अशा कमेंट्स ट्विंकल खन्नाच्या व्हिडीओवर येत आहेत. ट्विंकल खन्नाने 2001 मध्ये अभिनेता अक्षय कुमारशी लग्नगाठ बांधली. ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्यापूर्वी अक्षयचे नाव रवीना टंडन, शिल्पा शेट्टी यांच्यासोबत जोडले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आजचा दिवस कोणासाठी लकी? कृष्ण नवमीमुळे या राशींना मिळणार अनुकूल परिणाम

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT