‘रात गई बात गई…’; विवाहबाह्य संबंधांवर 'या' अभिनेत्रीने केलं धक्कादायक विधान, जान्हवी कपूरलाही बसला धक्का

Twinkle Khanna:ट्विंकल खन्ना आणि काजोल सध्या त्यांच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या टॉक शोमुळे चर्चेत आहेत. यामध्ये जान्हवी कपूर आणि करण जोहर शोमध्ये आले आहेत.
twinkle khanna reaction on extra marital affair leaves janhvi kapoor shocked
twinkle khanna reaction on extra marital affair leaves janhvi kapoor shocked Saam Tv
Published On

Twinkle Khanna: ट्विंकल खन्ना आणि काजोल सध्या त्यांच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या टॉक शोमुळे चर्चेत आहेत. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रीमियर झालेल्या या शोमध्ये लोकप्रिय चित्रपट कलाकार पाहुणे म्हणून आहेत. आता एक प्रोमो समोर आला आहे, यामध्ये जान्हवी कपूर आणि करण जोहर शोमध्ये आले आहेत. मुलाखतीदरम्यान, काजोल आणि ट्विंकलने दोघांना नात्यांमधील फसवणूकीबद्दल प्रश्न विचारला. आता या प्रश्नाचे जान्हवीने दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या शोचा एक मजेदार प्रोमो रिलीज झाला आहे. "दिस अँड दॅट" सेगमेंटमध्ये, काजोल आणि ट्विंकलने त्यांच्या पाहुण्यांना नात्यांशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. पण, "रिलेशनशिपमधील फसवणूक" हा विषय सर्वात चर्चेचा विषय बनला.

twinkle khanna reaction on extra marital affair leaves janhvi kapoor shocked
Singer Passes Away: प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

"टू मच" या चॅट शोमध्ये, करण आणि जान्हवीला पहिला प्रश्न विचारण्यात आला: "लग्नात सर्वात जास्त महत्त्वाचे काय असते?" उत्तरात, जान्हवीने "प्रेम" असे उत्तर दिले. दरम्यान, काजोल आणि करण जोहरने सुसंगततेवर भर दिला. काजोल म्हणाली, "कंपॅटिबिलिटीशिवाय प्रेम कधीही टिकू शकत नाही. जर "कंपॅटिबिलिटी" नसेल तर लग्नानंतर प्रेम संपणारी पहिली गोष्ट आहे." करणनेही अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेचे समर्थन केले.

twinkle khanna reaction on extra marital affair leaves janhvi kapoor shocked
Siddharth Jadhav: चेहऱ्यावर क्रौर्य, नजरेत दरारा; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मध्ये सिद्धार्थ जाधवचा काळजात धडकी भरवणारा लूक

विवाहबाह्य संबंधांबद्दल ट्विंकल खन्नाने काय म्हटले?

यामध्ये आणखी एक प्रश्न विचारण्यात आला भावनिक फसवणूक ही शारिरीक फसवणूकीपेक्षा मोठी असते का? यावर काजोल,ट्विंकल आणि करण जोहरने सहमती दर्शवली पण जान्हवी कपूर म्हणाली शारिरीक फसवणूकीमुळे पण लग्न तुटत ती देखील एक मोठी फसवणूक आहे. ट्विंकलची प्रतिक्रिया सर्वात जास्त चर्चेत आली. ती म्हणाली, "रात गई बात गई" ती आताशी २०ची आहे ५० ची झाल्यावर तिला समजेल. हा प्रोमो व्हायरल होत आहे आणि लोक जान्हवी कपूरच्या प्रतिक्रियेचे आणि प्रतिसादाचे कौतुक करत आहेत. दरम्यान, काजोल आणि ट्विंकलला चुकीचा संदेश पाठवल्याबद्दल ट्रोल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com