Urfi Javed New Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed New Video: अप्सरा आली..., उर्फी जावेदचा नवा अवतार, VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल भीती

Urfi Javed New Style: उर्फीचा हा व्हिडीओ (Urfi Javed New Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

Priya More

Urfi Javed Viral Video:

टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Actress Urfi Javed) आपल्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. उर्फी जावेदचा नवा लूक पाहून तुम्हाला ओळखताही येणार नाही. उर्फीने असा काही ड्रेस घातला आहे ज्याबद्दल तुम्ही विचार देखील करू शकत नाही. तिने केलेला मेकअप पाहून तुम्ही देखील हैराण होऊन जाल. उर्फीचा हा नवा अवतार पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. तिचा हा व्हिडीओ (Urfi Javed New Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

उर्फी जावेद आपल्या हटके आणि अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. रोज नवनवीन ड्रेसिंग स्टाईलमध्ये उर्फीला पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. तिच्या लूकचे चाहते कौतुक तर करतात. पण कौतुकापेक्षा जास्त तिला ट्रोल केले जाते. आता उर्फीचा आतापर्यंतचा सर्वात खतरनाक अवतार आज सर्वांना पाहायला मिळाला आहे. जो पाहून तुम्ही देखील घाबरल्याशिवाय राहणार नाही. ही उर्फीच आहे का असा प्रश्न देखील तुम्हाला पडेल.

फॅशनिस्टा उर्फी जावेदने सोशल मीडियावर तिचा नवा लूक शेअर केला आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा भीती वाटण्यासारखा लूक पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मला माझ्या आत असलेल्या सैतानला बाहेर काढायचे आहे.'

व्हिडीओमध्ये उर्फी जावेद आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक आणि खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने ब्रॅलेटशिवाय ब्लेझर असलेली पँट घातली आहे. तसंच उर्फीने आपल्या संपूर्ण अंगाला रंगरंगोटी केली आहे. उर्फीने सोन्याच्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला आहे. केसांची स्टाईलही खूपच भयानक आणि वेगळ्या पद्धतीने केली आहे. उर्फीचा हा अतरंगी लूक पाहून चाहते चांगलेच घाबरले आहेत. महत्वाचे म्हणजे या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला अप्सरा आली हे मराठी गाणं लावण्यात आले आहे.

उर्फी जावेदच्या या व्हिडीओला अवघ्या दोन तासांमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. उर्फी जावेदचा हा लूक पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. काहीजण व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये हनुमान चालिसाचे पठण करतानाही दिसले. या व्हिडीओवर कमेंट्स करत एका यूजरने लिहिले की, 'आता मी रात्री झोपू शकणार नाही.' दुसऱ्याने लिहिले की, 'मी शपथ घेतो की तू खूप वाईट दिसत आहेस.' तर तिसऱ्याने लिहिले की, 'अंडरवर्ल्डची अप्सरा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT