'MS Dhoni- The Untold Story' ला 7 वर्षे पूर्ण, दिशा पाटनीची सुशांत सिंह राजपुतसाठी इमोशनल पोस्ट

Disha Patani On Sushant Singh Rajput: या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपुतसोबत काम केलेली दिशा पटानी देखील त्याच्या आठवणीने इमोशनल झाली आहे.
MS Dhoni- The Untold Story
MS Dhoni- The Untold StorySaam Tv
Published On

Disha Patani Emotional Post:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते. आज सुशांत सिंह राजपुत (Sushant Singh Rajput) आपल्यामध्ये नाही पण या चित्रपटाच्या निमित्ताने प्रत्येक जण त्याला मिस करत आहे. या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपुतसोबत काम केलेली दिशा पटानी देखील त्याच्या आठवणीने इमोशनल झाली आहे. चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिशाने इन्स्टा पोस्ट (Disha Patani Emotional Post) शेअर करत सुशांतला मिस केले आहे.

'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी आणि दिशा पटानीने सुशांत सिंग राजपूतसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट क्रिकेटर एमएस धोनीच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात या तिघांनी देखील दमदार भूमिका साकारल्या आहेत. नुकताच दिशा पटानीने इन्स्टाग्रामवर सुशांतच्या आयकॉनिक चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. दिशा पटानीने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये या चित्रपटापासून सुरू झालेल्या तिच्या प्रवासाबद्दल एक छोटेसे कॅप्शन दिले आहे. दिशाच्या या पोस्टला ५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

दिशा पटानी देखील सुशांत सिंह राजपुतला खूप मिस करत आहे. तिने इन्स्टाग्रामवर एमएस धोनी चित्रपटातील तिचा आणि सुशांतच्या एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर कॅप्शनमध्ये तिने असे लिहिले आहे की, 'मी या सुंदर प्रवासाबद्दल आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील माझ्या पहिल्या चित्रपटाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. पश्चात्तापासाठी हे जग खूप लहान आहे. आम्ही सुशांतला अलविदा म्हणू शकलो नाही पण आशा करतो की तू आनंदी आणि शांततेत आहेस.' या चित्रपटात दिशा पटानीने सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड प्रियांकाची भूमिका साकारली होती. प्रियंकाचा चित्रपटात अपघात होऊन मृत्यू होतो.

सुशांत सिंग राजपूतने एमएस धोनी या चित्रपटामध्ये महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती. महेंद्र धोनी सारखं दिसावं यासाठी सुशांतने अनेक दिवस त्याच्या घरी राहून प्रशिक्षणही घेतले. एमएस धोनीच्या आधीही सुशांतने अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. पण एमएस धोनी चित्रपटातून त्याचा चांगली प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर सुशांतच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांत जरी आपल्यामध्ये नसला तरी तो त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये जिवंत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com