टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत फक्त तीन चित्रपटांमध्ये काम केले.
अभिनेत्रीने कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला.
चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे अश्लील मागणी केली होती.
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या संघर्ष काळातील एक प्रसंग सांगितला आहे. अभिनेत्रीने आपला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध नाव अभिनेत्री निती टेलरने तिच्या कारकिर्दीत केवळ तीन चित्रपटांत काम केले आहे. हे सर्व तेलुगु चित्रपट आहेत.
hauterrfly शी बोलताना अभिनेत्री निती टेलरने एका दिग्दर्शकाने तिच्यासोबत केलेल्या घाणेरड्या कृत्याचा खुलासा केला आहे. निती म्हणाली की, "ज्या दिग्दर्शकाने माझ्यासोबत पहिला चित्रपट केला होता, त्यानेच तो पूर्ण झाल्यावर मला दुसऱ्या चित्रपटासाठी बोलावले. त्यानंतर तो म्हणाला की, 'पण यावेळी तुला माझ्यासोबत झोपावे लागेल...' मला समजले नाही मी काय बोलावे, मी फक्त फोन कट केला आणि त्याचा नंबर ब्लॉक केला, माझ्या आईला फोन केला आणि तिला सांगितले- कल्पना कर त्या म्हाताऱ्या माणसाची..."
अभिनेत्री पुढे म्हणाली, "मी त्याला इतर तरुणींसोबत वगैरे पाहिले होते. तो माझ्यासोबत कधी असा प्रयत्न करेल हे मला माहीत नव्हते. तेव्हाच मी ठरवले की, मी पुन्हा कधीही कोणताही चित्रपट करणार नाही. मी फक्त त्याला ब्लॉक केले. मी हे कोणालाच सांगितले नाही कारण मी सुन्न झाले होते..."
नितीने २०१२ मध्ये 'मेम वयसुकु वाचम' (Mem Vayasuku Vacham) या तेलुगू चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. पुढच्या वर्षी, तिने 'पेल्ली पुस्तकम' (Pelli Pustakam) मध्ये काम केले. २०१४ मध्ये, रिलीज झालेला 'लव्ह डॉट कॉम' (Love Dot Com) हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला. ज्या दिग्दर्शकामुळे तिला 'कास्टिंग काउच'चा अनुभव आला, त्याचे नाव तिने सांगितले नाही.
नीतीने वयाच्या १५ व्या वर्षी 'प्यार का बंधन' या हिंदी मालिकेद्वारे टेलिव्हिजनवर पदार्पण केले. २०१४ मधील 'कैसी ये यारियां' या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. नीती अखेरची 'बडे अच्छे लगते हैं २' मध्ये दिसली होती. अलिकडेच अभिनेत्री 'अलायन्स' (Alliance) या रिअॅलिटी शोमध्येही झळकली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.