Bharti Singh
Bharti Singh Saam TV
मनोरंजन बातम्या

Bharti Singh On Body Shaming: प्राण्यांच्या उपमा द्यायचे..., बॉडी शेमिंगमुळे ट्रोल झालेली भारती अखेर बोलली

Saam Tv

Bharti Singh Troll: कॉमेडी क्वीन भारती सिंहने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. भारतीने तिच्या कामाच्या जोरावर यशाचे शिकार गाठले आहे. कॉमेडी रिअॅलिटी शो माध्यमातून भारतीने टीव्ही जगतात पाऊल ठेवले.

भारतीने सिंहने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीने सांगितले की अनेकदा तिला ट्रोल करण्यात आले आहे. स्वतः ला सिद्ध केल्यानंतर देखील तिला अनेकदा टार्गेट करण्यात आले आहे. लोक तिला वेगवेगळ्या नावाने चिडवायचे.

भारती सिंहने मुलाखतीत म्हणाली की, तिच्या करिअरच्या सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. त्यावेळी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. लोक तिला तिच्या शरीरावरुन चिडवायचे, अनेक विचित्र नावांनी हाक मारायचे. तिने सांगितले की काही लोक त्याला जाडी, म्हैस म्हणायचे तर काही हत्ती म्हणायचे.

भारतीने ती लठ्ठ आहे आहे कधीच नाकारले नाही. भारती सांगते की, मी कोणत्याही हलवाईची मुलगी नाही, 'मी मध्यमवर्गीयही नाही. मी खूप गरीब वर्गातून आले आहे आणि त्याच प्रकारचे अन्न खाऊन मी लठ्ठ झालो आहे, मग मी काय करावे? लठ्ठपणाचा मला काहीच वाटत नाही मी या त्या शरीरातही आनंदी होते आणि आजही आहे. मी जशी आहे तशीच बरी आहे.'

या मुलाखती दरम्यान भरती तिचा पती हर्षविषयी सुद्धा बोली आहे. भरती म्हणाला की, 'ती आणि हर्ष एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीही लोकांनी आम्हाला ट्रोल केले. लोकांच्या मते, कोणत्याही जाड मुलीने फक्त जाड मुलाशीच लग्न केले पाहिजे. मला चांगलं माहित आहे की मी लठ्ठ आहे आणि हे माझं आयुष्य आहे, मी कोणाशीही लग्न केलं तरी फरक मला पडत नाही.

भारती सिंहने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. दोघांनाही एक मुलगा आहे, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ भारती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

SCROLL FOR NEXT