Shahrukh Khan Movie: शाहरुखचा 'जवान' चित्रपटातील फोटो लीक, निर्माते करणार कायदेशीर कारवाई

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटातील फोटो लीक
Shahrukh Khan
Shahrukh Khan Saam Tv

Shahrukh Khan Movie Photo Leaked: शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपट 'जवान'ची उत्सुकता आहे. पण सध्या चर्चा हे 'जवान' चित्रपटातील एका फोटोची. शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटातील फोटो लीक झाला आहे. रेड चिलीजने इंटरनेटला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

चित्रपटाचे अधिकृत टीझर आणि पोस्टर व्यतिरिक्त या चित्रपटाविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ऍटली दिग्दर्शित या चित्रपटातबाबत आब्रिच खबरदारी बाळगण्यात आली आहे.

अलीकडेच शाहरुखचा एक फोटो लीक झाला होता, ज्यात तो चेहऱ्यावर कापड बांधून ट्रेनमध्ये शूटिंग करत होता. आता जो फोटो लीक झाला आहे, तो अनेकांना पाहता आला नाही. याआधी खबरदारी घेत 'जवान'ची निर्मिती करणाऱ्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने तो फोटो सोशल मीडियावरून हटवला.

Shahrukh Khan
Kiran Mane Post: बर्‍याचजणांना मी संपलो असं वाटलं..., किरण मानेंच्या पोस्टने चाहते चिंतेत

या फोटोमध्ये शाहरुख खान पॉवर ग्लासेस घातलेले आहेत. त्याच्या हातात स्नायपर किंवा बायनॅक्युलर असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुखचा फोटो लीक होताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. चाहत्यांना शाहरुखच्या चित्रपटांचे अपडेट्स दररोज हवे आहेत. 'जवान'च्या बाबतीत मात्र असे घडताना दिसत नाही. या चित्रपटाशी संबंधित सर्व गोष्टी अत्यंत गुप्त ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.

चित्रपटाच्या सेटवर उपस्थित असलेल्यांपैकी कोणीतरी हा फोटो लीक केला असल्याचे म्हटले जात आहे. हा फोटो लीक होताच रेड चिलीजमधील लोक सावधान झाले आहेत. त्यांनी सर्वात आधी तो फोटो सोशल मीडियावरून काढून टाकला आहे. त्यानंतर तो फोटो त्यांच्या टाइमलाइनवर शेअर करणाऱ्यांना आयटी कायद्यांतर्गत नोटीस पाठवण्यात आली. शाहरुखच्या एका फॅन पेजने नोटीसचा स्क्रीनशॉट त्याच्या हँडलने शेअर केला आहे.

चित्रपट निर्माते कोट्यवधी रुपये खर्च करून चित्रपट बनवतात. चित्रपटातील फोटो किंवा व्हिडीओ लीक झाल्यास चाहत्यांचा चित्रपट पाहण्याची हेतू बदलतो. दुसरा मुद्दा म्हणजे तो फोटो शेअर केला तर नोटीस आणि स्ट्राइकचाही धोका असतो. म्हणूनच रिक्स अजिबात घेऊ नये.

शाहरुखचा आणखी एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याचे टक्कल दिसत आहे. हा फोटो 'जवान'च्या लुक टेस्टचा असल्याचे बोलले जात आहे. तसेच या फोटोच्या आधारावर असे तर्क लावण्यात येत आहेत की, 'जवान'च्या काही सीन्समध्ये शाहरुख बॉल्ड लूकमध्ये दिसणार आहे.

शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन कंपनी 'जवान'ची निर्मिती करत आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू हे कलाकार देखील दिसणार आहेत.

याशिवाय थलपथी विजय आणि दीपिका पदुकोण यांचाही चित्रपटात कॅमिओ असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com