Kiran Mane Post: बर्‍याचजणांना मी संपलो असं वाटलं..., किरण मानेंच्या पोस्टने चाहते चिंतेत

किरण माने यांची पोस्ट पुन्हा चर्चेत.
marathi actor kiran mane
marathi actor kiran manesaam tv

Kiran Mane Social Media Post: अभिनेते आणि बिग बॉस मराठी ४ मधील स्पर्धक किरण माने सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यांनतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखीच भर पडली आहे. किरण माने तुकाराम महाराजांचे भक्त आहेत. तुकोबांचे अनेक अभंग किरण माने बिग बॉसच्या घरामध्ये असताना ऐकले आहेत.

काल म्हणजे ९ मार्चला तुकाराम महाराजांचे बीज होते. त्यानिमित्त किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी त्यांना तुकोबांमुळे खेळण्याचे अणि आयुष्यात पुढे जाण्याचे बळ मिळाले असे सांगितले आहे. तसेच जीवनाच्या संघर्षात त्यांची बाजू कशी पालटली आणि एका संधीने कसं आयुष्य मार्गी लागलं हे किरण माने यांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितले आहे.

marathi actor kiran mane
Ranbir-Alia On Paparazzi: रणबीर-आलियाच्या आयुष्यात डोकावणं भोवणार; पापाराझींवर होणार कायदेशीर कारवाई

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लेकीला आहे की, 'बा तुकोबाराया... तुझ्या सावलीत यिल त्याला "न सरे ऐसे दान" देनारा तू... मग लेकराला कमी करनारंयस व्हय? तू मला भरभरून दिलंयस माऊली, आभाळभर दिलंयस. अभिनेता म्हनून माझ्यावर प्रेम करनार्‍या माझ्या चाहत्यांना मी तुझं विचारधन शेअर करतो. ते माझ्या पोस्टस् वाचून तुला अभ्यासायला सुरूवात करत्यात, तवा तर आनंद होतोच... पन माझ्यावर टीका करनारे, मला ट्रोल करतानाबी कवाकवा जाणूनबुजून तुझ्या अभंगाचा आधार घेत्यात, तवा त्यांचा राग न येता, हरखून काळीज सुपाएवढं होतं ! "निंदक तो परउपकारी.. काय वर्णूं त्याची थोरी !" असं म्हनावं वाटतं.

...मागच्या एका वर्षात माझ्या भावविश्वात आणि करीयरमध्ये लै खतरनाक उलथापालथी झाल्या. लढलो जिगरा लावून, पन खरंतर आतनं जीव घाबराघुबरा झालावता... "तुका म्हणे माझे दचकले मन... वाटे वायांवीण श्रम गेला" अशी अवस्था व्हायची.. पन दूसर्‍या बाजूला मी तुझा हात घट्ट पकडला होता... हिंमत आन् ताकद एकवटून झुंजत होतो.. शत्रूची एकेक चाल उधळून लावत होतो. "तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे... अवघियांचे काळे केले तोंड !"

marathi actor kiran mane
Viral Video: WPL मध्ये पठानचा जलवा! महिला खेळाडूंचा 'झुमे जो पठान'वर जबरदस्त डान्स

बिगबाॅसमधी जायच्या महिनाभर आधी देहूला तुझ्या पायांवर डोकं ठेवायला आलोवतो. लै बेकार मनस्थिती होती. मनापास्नं, जीव लावून कामाचा आनंद घेत असतानाच, कटकारस्थानी लोकांनी माझ्यासमोरनं कॅमेरा हिरावून घेतल्याला सहा महिने उलटून गेलेवते. "जीवना वेगळी मासोळी.. तैसा तुका म्हणे तळमळी" अशी अवस्था झालीवती. गाथा बुडवल्यावर अन्नपानी सोडून तू ज्या शिळेवर बसलावतास, त्या शिळेकडं बघताना डोळं भरून आलं. अचानक मनात आलं, तू ज्या भयाण, 'पर्वताएवढ्या' वेदनेतनं गेलायस, त्यापुढं माझं दु:ख म्हन्जे 'जवा'एवढं ! तिथनं उठलो आन् भिडलो जगन्याला.

बर्‍याचजणांना मी संपलो असं वाटत असतानाच माझ्या आयुष्यानं अशी उसळी घेतली...अशी भरारी घेतली की वाटलं, "याचसाठी केला होता अट्टाहास !. पूर्वी फेसबुकवरनं तुझ्या अभंगांचं निरूपण करताना हजारो लोक ते वाचतात, समजुन घेतात, प्रेरणा घेतात याचं लै समाधान असायचं. नंतर त्यापुढं एक पायरी वर जाऊन 'बिगबाॅस'च्या घरातल्या कॅमेर्‍यातनं रोज लाख्खो, कोट्यावधी लोकांपर्यन्त तुझे अभंग पोचवताना छाती अभिमानानं भरून यायला लागली !

माऊली, आता माझं आयुष्य एका नव्याच वाटेवर आणून ठेवलंयस तू. खडबडीत, काट्याकुट्यांची वाट संपली. गाडी मेनरोडला लागलीय.. मेगा हायवे थोडा नजरेच्या टप्प्यात आलाय. तिथं पोचायलाबी कमी संघर्ष नाय, पन आता मी ढिला पडत नस्तोय. मनापास्नं, प्रामाणिकपणानं आणि महत्त्वाचं म्हन्जे 'अभ्यासून' काम करायचा तुझा सल्ला इसरनार नाय. जीवाचं रान करीन, रक्ताचं पानी करीन.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com