Kishori Ambiye Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kishori Ambiye: ‘प्राध्यापिका किशोरी आंबिये’, ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत दिसणार वेगळ्या भूमिकेत

Tu Bhetashi Navyane: अभिनेत्री किशोरी आंबिये लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

कधी खाष्ट, कधी प्रेमळ, तर कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत.

कॉलेजच्या प्राध्यापिकेची भूमिका त्या यात साकारत आहेत. पद्मिनी गाडगीळ असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी व्यक्तिरेखा यात साकारत आहेत. ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.००वा. प्रसारित होते.

मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांत वेगळ्या शैलीत दिसणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते संदीप जाधव आहेत.

या मालिकेत किशोरी आंबिये' यांचे दोन ट्रॅक असून त्यांच्या नव्या व्यक्तिरेखेमुळे मालिकेत काय वळण येणार? हे बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन काळातल्या व्यक्तिरेखा त्या यात साकारत असून प्राध्यापिकेच्या भूमिकेनंतर नव्या ट्रॅकमध्ये त्या कोणत्या रूपात दिसणार? आणि त्यांच्या येण्याने अभिमन्यू आणि तन्वीच्या आयुष्यात काय होणार ? की त्यांच्या येण्याने या दोघांचे बंध जुळले जाणार? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे.

चांगल्या विषयामुळे आणि भूमिकेमुळे मी या मालिकेला होकार दिला. मैत्री आणि प्रेम या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारी ही मालिका आहे. 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका करताना खूप मजा येत असल्याचे किशोरी आंबिये' सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT