Vijay-Trisha Krishnan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vijay-Trisha Krishnan : कांजीवरम साडी अन् केसात मोगऱ्याचा गजरा; विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेत्री त्रिशा कृष्णनची हजेरी, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Trisha Krishnan Attend Vijay Thalapathy Swearing Ceremony : सुपरस्टार थलापती विजय यांनी नुकतीच तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्याला विजय यांच्या कुटुंबासोबतच अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिनेही हजेरी लावली.

Shreya Maskar

थलापती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

थलापती विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले.

शपथविधी सोहळ्याला अभिनेत्री त्रिशा कृष्णने हजेरी लावली.

तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी ऐतिहासिक घटना घडली आहे. थलापती विजय यांनी आज (१० मे २०२६) रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सुपरस्टार थलापती विजय हे आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री (Vijay Thalapathy - Chief Minister of Tamil Nadu) झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तामिळनाडू विधानसभेच्या निकालानंतर कार्यकर्ते, विजय यांचे कुटुंबिय या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहत होते.

विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांच्या कुटुंबासोबतच साउथ अभिनेत्री तृषा कृष्णनने देखील हजेरी लावली. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'तमिलगा वेट्री कझगम' (TVK) चे प्रमुख सी. जोसेफ विजय यांचा शपथविधी सोहळा चेन्नई येथे थाटामाटात पार पडला. हा सोहळा जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर पार पडला. या सोहळ्याला अभिनेत्री त्रिशा कृष्णन पारंपरिक लूकमध्ये स्पॉट झाली. तिने सुंदर निळ्या रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. केसात गजरा , नक्षीकाम केलेला ब्लाउज , आकर्षक दागिन्यांनी अभिनेत्रीने लूक पूर्ण केला होता. तिच्या चेहऱ्यावर विजय यांच्या विजयाचा आनंद झळकत होता.

त्रिशा कृष्णनची प्रतिक्रिया

त्रिशा कृष्णनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अभिनेत्रीला 'तामिळनाडूसाठीच्या या एका मोठ्या दिवसा'बद्दल तिचे मत विचारले जात असल्याचे दिसून येते. तेव्हा त्रिशा कृष्णन म्हणते की, "धन्यवाद, मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते..." विजय यांचे हे यश पाहून त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आले.

त्रिशा-विजय

त्रिशा कृष्णन आणि विजय यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी आहे. त्रिशा आणि विजय यांनी 'घिल्ली' (२००४), 'तिरुपाची' (२००५), 'आथी' (२००६), 'कुरुवी' (२००८) आणि 'लिओ' (२०२३) यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसैनिक खचला नाही तर पेटलाय- उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात झळकले ठाकरेसेनेचे खासदार संजय दीना पाटील यांचे पोस्टर|VIDEO

शिवसेनेच्या वर्धापन दिनी भावनांचा बांध फुटला; सुषमा अंधारेंना रडू कोसळले|VIDEO

कोणतीही ऑफर नाही; पहिल्या दिवसापासून ठाकरेंसोबतच! शिवसेनेच्या निष्ठावंत खासदाराची ठाम भूमिका|VIDEO

Meloni Vs Trump : मेलोनी डोनाल्ड ट्रम्पवर संतापल्या; म्हणाल्या, मी कधीच कुणाकडे भीक मागत नाही!

SCROLL FOR NEXT