Pushpa 2 The Rule Release Date Postpone Twitter
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 The Rule Release Date : 'पुष्पा २' चित्रपटाची रिलीज डेट बदलली; 'या' तारखेला अल्लू अर्जुन गाजवणार थिएटर; जाणून घ्या...

Pushpa 2 The Rule Release Date Postpone : अल्लू अर्जुनचा हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र, आता चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आलेली आहे.

Chetan Bodke

२०२४ या वर्षातील बिग बजेट चित्रपट म्हणून 'पुष्पा २ : द रुल' चित्रपटाकडे पाहिले जाते. या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. आतापर्यंत अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाचा लूक, चित्रपटातले २ गाणे आणि टीझर रिलीज झालेला आहे. यामुळे प्रेक्षकांना आता चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र, आता चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आलेली आहे. चित्रपट निर्मात्यांनी नवी रिलीज डेटही जाहीर केली आहे.

शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, अल्लूने कोट परिधान केला असून डोक्यावर शाल गुंडाळलेली दिसत आहे आणि त्याच्या हातात तलवार दिसत आहे. अशा या खतरनाक अवतारात अल्लू अर्जुन दिसत आहे. पुष्पाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज डेटची घोषणा करताना म्हटले की, "आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट कलाकृती देणार आहोत. चांगल्या मनोरंजनासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करा. 'पुष्पा २ : द रुल' आता ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे." चित्रपट या वर्षाअखेरीज रिलीज होणार असून निर्मात्यांसह कलाकारांनी सोशल मीडियावर चित्रपटाची नवी रिलीज डेट शेअर केलेली आहे.

यापूर्वी 'पुष्पा २ : द रुल' १५ ऑगस्टला रिलीज होणार होता पण आता हा चित्रपट ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे. चंदन तस्करीमध्ये दादा असणाऱ्या पुष्पा समोर आता डॅशिंग पोलिस ऑफिस असणार आहे. फहाद फाजिलने या पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. दोघांमधील खतरनाक ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. शिवाय पुष्पा आणि श्रीवल्लीची पुढील लव्हस्टोरीही मनोरंजन करणार आहे. सुकुमार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ५०० कोटींच्या बजेटमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’चा समावेश असणार आहे. ‘पुष्पा’प्रमाणेच ‘पुष्पा २’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल, यामध्ये शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

Shailesh Jejurikar : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व; मराठमोळे शैलेश जेजुरीकर कोण आहेत? VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिकेत 85 लाखांचा ड्रेनेज घोटाळा प्रकरण; कनिष्ठ अभियंता,वरिष्ठ लिपीक निलंबित

SCROLL FOR NEXT