Rashmika Mandanna Career Struggle Saam TV
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandana Birthday: घराचं भाडं द्यायला अन् खेळणी खरेदी करायला पैसे नव्हते; 'नॅशनल क्रश'चा डाऊन टू अर्थ थक्क करणारा फिल्मी प्रवास

Rashmika Mandana: टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणाऱ्या नॅशनल क्रश बनलेल्या रश्मिका मंदानाने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Chetan Bodke

Rashmika Mandanna Career Struggle

टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणाऱ्या नॅशनल क्रश बनलेल्या रश्मिका मंदानाने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रश्मिका मंदाना आज २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. ५ एप्रिल १९९६ रोजी जन्मलेल्या रश्मिकाने वयाच्या १९ व्या वर्षी साऊथ फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. 'किरिक पार्टी' या चित्रपटातून रश्मिकाने सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. २०१६ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट तिच्यासाठी सर्वात हिट चित्रपट ठरला. तिच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्यांची तुम्हाला फारशी माहिती नसेल. (Tollywood)

कर्नाटक राज्यातील कोडागु जिल्ह्यामध्ये रश्मिकाचा जन्म झालेला होता. रश्मिकाचे शालेय शिक्षण कुर्गमध्ये तर, उच्च शिक्षण बंगळुरूमध्ये झाले. रश्मिकाने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी लिटरेचर अशा तीन विभागामध्ये पदवीचे शिक्षण घेतले. २०१४ मध्ये तिच्या कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता, तो कार्यक्रम तिच्या करियरसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला. त्यावेळी तिने कॉलेजमध्ये 'क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस' (Clean And Clear Fresh Face winner) हा किताब पटकावला. त्यानंतर रश्मिकाची ही जाहिरात एका दिग्दर्शकाने पाहिली. आणि त्यानंतर रश्मिकाला थेट त्यांनी 'किरिक पार्टी' चित्रपटातच काम करण्याची संधी दिली. (Rashmika Mandanna)

'किरिक पार्टी' चित्रपटातून रश्मिका मंदान्नाने अभिनयात पदार्पण केले. हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरला होता. हा चित्रपट २०१६ मध्ये कन्नड सिनेसृष्टीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. पहिल्याच चित्रपटापासून रश्मिकाच्या जादूने चाहत्यांना भुरळ घातली. तिचे हास्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली. रश्मिकाला त्याच वर्षी 'सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री'चा सिमा पुरस्कार (SIIMA Award) मिळाला होता. तिला या पुरस्कारामुळे फार मोठी प्रसिद्धी मिळाली. फक्त टॉलिवूडमध्येच नाही तर, बॉलिवूडमध्येही रश्मिकाच्या अभिनयाचा करिष्मा कायम आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर निर्माण केलेले आहे. (Bollywood Actress)

फार कमी लोकांना माहित असेल, आज कोट्यवधींची कमाई करणाऱ्या रश्मिकाच्या आई-वडिलांकडे तिच्यासाठी खेळणी विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते. रश्मिकाने हिंदुस्तान टाइम्सला एक मुलाखत दिली होती, त्यामध्ये अभिनेत्रीने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. रश्मिकाने मुलाखतीत सांगितले की, "एक काळ असा होता जेव्हा माझ्या आई-वडिलांना घर मिळवण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांच्याकडे घराचे भाडेही द्यायला पैसे नव्हते. परिस्थिती इतकी हालाकीची होती की, आई- वडिल आपल्या मुलीला खेळणी देखील विकत घेऊ शकले नाहीत." बालपणीचे हे दिवस आठवून अभिनेत्री कायमच कष्टातून कमावलेल्या पैशाला महत्त्व देते. (Bollywood Film)

रश्मिकाने जेव्हा अभिनयात करिअर करण्याचा विचार केला, तेव्हा तिच्या या निर्णयाला तिच्या आई- वडिलांनी तिच्या निर्णयाला फारसा पाठिंबा दिला नाही. त्यांच्याकडून सतत विरोध येत असल्याने तिने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. रश्मिकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या आई वडिलांनी तिला साथ दिली. आज रश्मिकाच्या कामाचा आलेख पाहून कायमच तिच्या पालकांना अभिमान वाटतो. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT