Prathamesh- Kshitija Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Prathamesh- Kshitija Wedding: दगडूला मिळाली रियल लाईफमधली प्राजू, प्रथमेश- क्षितीजाने बांधली लग्नगाठ

Prathamesh- Kshitija Wedding: ‘टाईमपास’ फेम दगडू अर्थात प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

Chetan Bodke

Prathamesh- Kshitija Wedding

‘टाईमपास’ फेम दगडू अर्थात प्रथमेश परब नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरने लग्नगाठ बांधली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्याच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत होती. (Marathi Film)

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. यावेळी प्रथमेश आणि क्षितीजाच्या कुटुंबीयांसह दोघांच्याही मित्रमंडळींनीही लग्नाला उपस्थिती लावली होती. त्यासोबतच प्रथमेशचे काही सेलिब्रिटी मित्र मंडळीही यावेळी लग्नाला उपस्थित होते. (Marathi Actors)

लग्नाला या कपलने खास मराठमोळा लूक केला होता. प्रथमेशने शेरवानी परिधान केली होती, क्षितीजाने मराठमोळी साडी परिधान केली होती. सध्या या कपलच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ‘टाईमपास’ चित्रपटातील दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परबने १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी धुमधडाक्यात साखरपुडा केला. मुख्य बाब म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या कपलच्या रिलेशनला तीन वर्षे झाली होती. साखरपुड्यासह, हळदी, मेहंदी आणि लग्नालाही प्रथमेशच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही उपस्थिती लावली होती. (Social Media)

दरम्यान, प्रथमेश परब गेल्या काही वर्षांपासून क्षितिजा घोसाळकरला डेट करत आहे. इन्स्टाग्रामवर या दोघांची ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. क्षितीजा ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. तर सोबतच ती फॅशन डिझायनर सुद्धा आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT