Baghi 4 Trailer Saam TV
मनोरंजन बातम्या

Baghi 4 Trailer: शैतान की लव्हस्टोरी...; टायगर श्रॉफ घेणार गर्लफ्रेंडच्या मृत्यूचा बदला बदला, 'बागी ४'चा थरारक ट्रेलर रिलीज

Baghi 4 Trailer Release: टायगर श्रॉफ पुन्हा एकदा बंडखोर झाला आहे. त्याच्या आगामी 'बागी ४' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये जबरदस्त एॅक्शन करताना दिसणार आहे.

Shruti Vilas Kadam

Baghi 4 Trailer Release: टायगर श्रॉफ आणि संजय दत्त स्टारर अॅक्शनपॅक्ड 'बागी ४' चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अंदाधुंद रक्तपात आणि हिंसाचार पाहायला मिळतो. हा ट्रेलर तुम्हाला 'अ‍ॅनिमल' आणि 'मार्को' सारख्या चित्रपटांची आठवण करून देतो.

चित्रपट संवाद आणि रक्तपात

'मी अनेक प्रेमकथा ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. पण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी अॅक्शनपॅक्ड लव्हस्टोरी पाहिली आहे.' ट्रेलरची सुरुवात या व्हॉइस ओव्हरने होते. यानंतर संजय दत्त रक्ताने माखलेल्या पांढऱ्या कोट-पँटमध्ये दिसतो. ३ मिनिटे ४१ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये काही चित्रपट संवादांसह जबरदस्त अॅक्शन आणि रक्तपातही पाहता येतो. या ट्रेलरवर वयाची मर्यादा घालण्यात आली आहे. ट्रेलरमधून कळते की टायगर श्रॉफचे पात्र नाव रॉनी आहे.

'बागी ४'मधील कलाकार

टायगर श्रॉफ आणि संजय दत्त व्यतिरिक्त सोनम बाजवा, श्रेयस तळपडे, हरनाज कौर संधू आणि सौरभ सचदेवा आहेत. ट्रेलरमधील काही दृश्यांमध्ये टायगर श्रॉफ नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे. 'बागी ४' मध्ये संजय दत्त एका धोकादायक खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटातील प्रत्येक पात्र अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. सोनम बाजवा आणि हरनाज संधूही अ‍ॅक्शन करताना दिसत आहेत.

'बागी ४' आणि 'द बंगाल फाइल्स'ची होणार टक्कर

ए हर्षा दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित 'बागी ४' येत्या शुक्रवारी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या दिवशी विवेक अग्निहोत्रीचा 'द बंगाल फाइल्स' देखील बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहे. आता 'बागी ४' आणि 'द बंगाल फाइल्स' यांच्यात बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदारांची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT