Pati Patni Aur Woh 2: 'पती पत्नी और वो २'च्या प्रोडक्शन हेडवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक; FIR दाखल

Pati Patni Aur Woh 2: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अभिनेता आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या आगामी 'पती पत्नी और वो २' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका क्रू मेंबरवर हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.
Pati Patni Aur Woh 2
Pati Patni Aur Woh 2Saam Tv
Published On

Pati Patni Aur Woh 2: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अभिनेता आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या आगामी 'पती पत्नी और वो २' या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. यादरम्यान 'पती पत्नी और वो २'च्या क्रू मेंबरवर काही स्थानिक रहिवाशांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून मुख्य आरोपीला अटक केली आहे.

स्थानिक रहिवाशांनी हल्ला केला

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, अतिरिक्त पोलिस उपायुक्त (शहर) अभिजीत कुमार यांनी सांगितले की, २७ ऑगस्ट रोजी येथील थॉर्नहिल रोडवर 'पती, पत्नी और वो २' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली. बीआर चोप्रा फिल्म्सचे प्रोडक्शन हेड जोहेब सोलापूरवाला यांच्यावर काही स्थानिक रहिवाशांनी हल्ला केल्याचा आरोप आहे.

Pati Patni Aur Woh 2
Allu Arjun Grandmother Death: अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन
https://www.reddit.com/r/BollyBlindsNGossip/comments/1n28p4w/fight_during_shooting_of_pati_patni_aur_wo_2/?utm_source=embedv2&utm_medium=post_embed&utm_content=post_body&embed_host_url=https://www.amarujala.com/entertainment/bollywood/prayagraj-local-fight-with-pati-patni-aur-woh-2-movie-staff-video-viral-2025-08-28

मुख्य आरोपीला अटक

बीआर चोप्रा फिल्म्सचे प्रोड्यूसर सौरभ तिवारी यांच्या तक्रारीवरून २८ ऑगस्ट रोजी सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलीसांनी कारवाई करत मुख्य आरोपी मेराज अलीला अटक करण्यात आली आहे.

हा चित्रपट 'पती पत्नी और वो' चा सिक्वेल आहे.

आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या 'पती पत्नी और वो २' या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या प्रयागराजमध्ये सुरू आहे. यावेळी, रेडिटवर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, जो एका स्थानिक व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही स्थानिक लोक चित्रपट कर्मचाऱ्यांना मारहाण करत आहेत. 'पती पत्नी और वो २' हा चित्रपट २०१९ च्या हिट चित्रपट 'पती पत्नी और वो' चा सिक्वेल आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर, अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट मुदस्सर अझीझ यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com