Pathaan 4th day collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan: शाहरुखचा 'पठान' ठरला दाक्षिणात्य चित्रपटांच्या वरचढ, 'या' यादीत स्थान मिळवत शिरपेचात रोवला मानाचा तुरा...

२०२३ वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'पठान'ने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेत.

Chetan Bodke

Pathaan: गेल्या वर्षी अनेक बॉलिवूड चित्रपट चांगलेच फ्लॉप ठरले होते. काही क्वचित चित्रपटांनीच बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली. गेल्या वर्षात दाक्षिणात्य चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर बरीच हवा होती. पण या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'पठान'ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले. त्यात मुख्यत्वे दाक्षिणात्य चित्रपटांचे त्याने रेकॉर्ड मोडले.

'पठान'मधील पाहिलं गाणं ज्यावेळी प्रदर्शित झाले होते तेव्हा चित्रपटावर अनेक बंदी घालण्याची मागणी केली होती. बंदी घालण्याची मागणी जरी केली असली तरी, ट्रेलर सह गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.

चित्रपट समीक्षक रमेश बाला चित्रपटाबद्दल ट्वीट करत म्हणतात, “पठान चित्रपटाने जगभरात पहिल्या दिवशी १०० कोटींची कमाई केली. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत बहुतांश दाक्षिणात्य चित्रपट आहेत. पण आता या यादीत एक बॉलिवूड चित्रपटही सहभागी झाला आहे.”

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अनेक दाक्षिणात्य चित्रपट आहेत. बाहुबली २, २.०, कबाली, साहो, आरआरआर, केजीएफ २, पठान हे चित्रपट आहेत.

'पठान' हा चित्रपट २५ जानेवारीला तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

SCROLL FOR NEXT