Rakhi Sawant Mother's Funeral: अभिनेत्री राखी सावंतची आई जया भेडा यांचे २८ जानेवारी २०२३ रोजी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून ब्रेन ट्युमर आणि कॅन्सरशी झुंज देत होत्या. याआधी सलमान खान आणि सोहेल खान यांनी राखी सावंतच्या आईच्या उपचारासाठी मदत केली होती तेव्हाही त्यांचे कर्करोगाचे ऑपरेशन झाले होते. उद्योगपती अनिल अंबानी यांनी देखील राखीला तिच्या आईच्या वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत केली होती.
राखी सावंतची आई जया भेडा यांच्यावर आज (२९ जानेवारी) अंत्यसंस्कार पार पडले आहेत. जया भेद यांच्या अंत्यसंस्काराला टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सही उपस्थित होते. रश्मी देसाई, फराह खान ते संगीता अशा अभिनेत्रींनी राखी सावंतला आधार दिला. राखी सावंतसोबत तिचा भाऊ राकेश सावंतही आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता.
राखी सावंतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचारादरम्यान तिच्या आईचा मृत्यू झाला. राखी सावंतला या दुःखात साथ देण्यासाठी तिचा पती आदिल दुर्रानीही तेथे उपस्थित होता. व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओमध्ये आदिल राखीसोबत दिसत होता. राखी सावंतचा भाऊ राकेशही सकाळपासूनच हॉस्पिटलमध्ये दिसत होता.
राखी सावंतच्या आईवर म्युनिसिपल ख्रिश्चन सेमेटरी, ओशिवरा, अंधेरी, पश्चिम येथे अंत्यसंस्कार नेण्यात आले होते. यावेळी ख्रिश्चन प्रथेनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. राखीच्या आईला थडग्यात ठेवले होते. तसेच प्राथर्ना करून तसेच गाणी गाऊन त्यांना निरोप देण्यात आला.
आईच्या जाण्याने राखी सावंत पूर्णपणे तुटली आहे. तिला स्वतःला सांभाळणे देखील कठीण झाले आहे. आईचा मृतदेह पाहून ती नुसती रडत असते. पती आदिलने तिची काळजी घेत आहे. आई गेल्याने पोरकी झालेली राखी, माझं कुणीच नाही, आई गेली, मी अनाथ झाले असे सतत बोलत आहे.
आईला शेवट निरोप दिल्यानंतर राखीने माध्यमांसमोर येऊन तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'सर्वांचे खूप खूप आभार. आज माझी आजी सर्व वेदनांपासून मुक्त झाली आहे. सर्वांचे मी आभार मानते. आज ती स्वर्गात देवाजवळ गेली आहे आणि चांगल्या जागी आहे. तसेच सर्व वेदनांपासून तिला मुक्ती मिळाली आहे.' सर्वांचे आभार मनात तिने आईला मुक्ती मिळाल्याचे सांगितले आहे.
राखी सावंतला रश्मी देसाईला मिठी मारून रडू रडताना दिसत आहे. राखीच्या सर्व मित्र, नातेवाईक आणि प्रसारमाध्यमांनी तिच्या आईला अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
तसेच फराह खानने देखील राखीच्या आईचे अंत्यदर्शन घेतले. फराहने राखीची भेट देखील घेतली. एका इंग्रजी वृत्त संस्थेशी बोलताना फराह म्हणाली, ज्याने आपली आई गमावली त्यांच्यासाठी हे अत्यंत वेदनादायक आहे. आई नेहमीच महत्वाची असते. मी त्यांना जास्त भेटलो नाही पण प्रत्येक वेळी त्या आजारी असताना मी राखीला फोन करत असे आणि मला वाटते, तुम्ही सर्वांनी कृपया तिला या दुःखाच्या काळात थोडा वेळ द्यावा. मला खात्री आहे की राखी नेहमीच तिच्या आईचा अभिमान वाटेल असे काम करेल आणि तिने काम करत राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.