Adah Sharma On Buying SSR House Saam TV
मनोरंजन बातम्या

Adah Sharma On Buying SSR House: ‘नवं घर घेतलं तरी मी कोणाला...’, सुशांत सिंह राजपूतचं घर खरेदी करण्याच्या चर्चांवर अदा शर्माने सोडलं मौन

Adah Sharma Interview: गेल्या काही दिवसांपूर्वी अदा शर्माने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं मुंबईतलं घर खरेदी केल्याची चर्चा होत होती. या चर्चांवर अदा शर्माने मौन सोडलं आहे.

Chetan Bodke

Adah Sharma On Buying SSR House

‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा बरीच प्रसिद्धी झोतात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अदा शर्माने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुंबईतील घर खरेदी केले असल्याची चर्चा होती. मुंबईतल्या बांद्रामध्ये माँट ब्लँक अपार्टमेंटमध्ये सुशांत सिंह राजपूत राहायचा. त्याच घरामध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. नुकतंच अभिनेत्रीने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत घराविषयी जरा स्पष्टच सांगितलं आहे.

हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली, “मी कुठे राहते आणि कुठे नाही, याविषयीची माहिती वृत्तपत्र, मोबाईलमध्ये व्हायरल व्हावी असं मला वाटत नाही.माझ्यासाठी माझं घर एका मंदिराप्रमाणे आहे. मी माझ्या बालपणापासून पिल्लईतल्या माझ्या वडीलांच्या घरी राहतेय. मी जरी, नवं घरी राहण्याचा विचार केला तरी मी कोणाला सांगणार नाही. मला ते माझ्या पद्धतीने शेअर करायला जास्त आवडेल.” (Bollywood)

“योग्य वेळ आली की मी सांगेल. आपण जिथे राहतो ती जागा आपली खासगी जागा असते. सध्या तरी मी फक्त आपल्या चाहत्यांच्या हृदयात राहणं पसंद केलं आहे. अफवा ह्या कलाकारांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. आपल्या आवडत्या कलाकाराचा आवडता रंग, आवडता पदार्थ आणि इ... बद्दल चाहत्यांना सर्वच ठाऊक आहे. मला माझ्या विषयीची माहिती कोणालाही सांगायला आवडत नाही. कोणासोबत शेअर करावे आणि कोणासोबत शेअर करु नये, हे माझे खासगी मत आहे. मला या अफवांमुळे अस्वस्थता जाणवत नाही.” (Bollywood Actress)

“खरं तर मला माझं आयुष्य खाजगी ठेवायला आवडते. मी ‘द केरला स्टोरी’च्या शूटिंग दरम्यान असताना कोणालाही शुटिंग बद्दल सांगितले नाही. अनेकांनी मला शुटिंग दरम्यान काय चाललंय ?याची माहिती मिळवण्यासाठी फोने केलेले. पण मी कोणालाही माझ्या प्रोजेक्टबद्दल सांगितले नाही. माझे चित्रपट रिलीजसाठी येतात, तेव्हाच मी त्याबद्दल बोलते. ” अशी प्रतिक्रिया अदा शर्माने दिलेली आहे. दिलेल्या मुलाखतीत अदाने सुशांतचे घर विकत घेणार आहे की नाही याबद्दल स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.

अदा शर्माच्या कामाबद्दल बोलायचे तर, मे २०२३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’नंतर ती खूपच प्रकाशझोतात आली. ती कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी चित्रपटाविषयीच्या बातम्या शेअर करत असते. लवकरच सत्य घटनेवर आधारित ‘बस्तर’ चित्रपटाच्या माध्यमातून अदा शर्मा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कीर्तनात गोंधळामुळे संगमनेरचे आजी माजी आमदार आमने सामने

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT