बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अदा शर्माला (Adah Sharma) तिचा ब्लॅकबस्टर चित्रपट 'द केरला स्टोरी'मुळे (The Kerala Story) खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले. हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला महिला प्रधान चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे अदा शर्माला खरी ओळख मिळाली. अदा शर्मा आगामी काळात जबरदस्त चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे.
अदा शर्मा आता एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये महिला सुपरहिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच अदा शर्मा एका लोकप्रिय वेब सीरिजच्या सीझन 2 मध्ये देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच लवकरच तिच्या आणखी दोन मोठ्या चित्रपटांची घोषणा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अदाच्या नव्या चित्रपटांची चाहते वाट पाहत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अदा शर्मा सध्या 'द केरला स्टोरी' दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि निर्माता विपुल अमृतलाल शाह यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. अदा सध्या 'बस्तर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने अॅक्शन डायरेक्टर अँडी लाँग म्हणजेच जॅकी चॅनचा अॅक्शन डायरेक्टरसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बंदूक निवडताना दिसत आहे. हा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर करत अदाने कॅप्शनमध्ये 'अदा का स्वयंवर, योग्य बंदूक निवडा.', असे लिहिले.
अदा शर्माने फक्त बॉलिवूड नाही तर साऊथ चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. '१९२०' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर तिने वेगवेगळ्या जबरदस्त भूमिका साकारल्या ज्या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. आता 'बस्तर' चित्रपटामध्ये तिला पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटातील अदाच्या फर्स्ट लूकने सर्वांना आश्चर्यचकीत केले.
दरम्यान अदा शर्माच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट फक्त १५ ते २० कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.