Adah Sharma Buys Sushant Singh Rajput House: 'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर? अभिनेत्रीने केला खुलासा

Adah Sharma Break Silence: अदा शर्माने तिच्या नवीन घराविषयी काय सांगितले ते वाचा.
Adah Sharma Buys sushant Singh Rajput House
Adah Sharma Buys sushant Singh Rajput HouseSaam TV

Sushant Singh Rajput Mumbai House Bought By Adah Sharma:

'द केरला स्टोरी' चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा प्रसिद्धी झोतात आली. अदा शर्माने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुंबईतील घर खरेदी केले असल्याची चर्च आहे.

मुंबईतील बांद्रा येथील या मॉँट ब्लँक अपार्टमेंटमध्ये सुशांत सिंह राजपूत राहत होता. त्याची कथित आत्महत्या याच घरामध्ये झाली.

Adah Sharma Buys sushant Singh Rajput House
Jawan New Song: 'Not Ramaiya Vastvaiya' भन्नाट डान्स करत शाहरुख खानने शेअर केला जवानमधील नवीन गाण्याचा टीझर

टेली चक्कर यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, त्यांची अदा शर्माशी संपर्क साधला असता तिच्या टीमने हे वृत्त खरे असल्याचे सांगितले आहे. परंतु अभिनेत्री या घरामध्ये कधी शिफ्ट होत हे माहित नाही.

टेली चक्कर पोर्टलने त्यांच्या वृत्तात नहटले आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर घराचे भाडे वाढविण्यात आले होते. त्यामुळे हे घर चर्चेत होते. अनेकांना हे घर विकत घ्यायचे होते. अखेर अदा शर्मासोबत डील झाली आणि हे घर तिने खरेदी केले.

शनिवारी, अदाला मीडियाने पाहिल्यानंतर तिच्याशी संपर्क साधला. मीडियाशी बोलताना अदाने थोडक्यात सांगितले की, जेव्हा ती फायनल करेल तेव्हा ती आधी मीडियासोबत शेअर करेल. "जे असेल ते मी पहिले तुम्हाला येऊन सांगेन. जेव्ह जे काही असेल, मी प्रॉमिस करते, जर असं काही असेल तर." हा व्हिडिओ विरल भयानीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये, सुशांतचा सी-फेसिंग फ्लॅट भाड्याने घेण्यास कोणाला रस नाही. लोकप्रिय रिअल-इस्टेट एजंट रफिक मर्चंट यांनी SSR च्या घरासाठी करार क्रॅक करण्याबद्दल उघड करत सांगितले की भाडेकरूंऐवजी, घर खरेदी करणाऱ्यांना यात जास्त रस आहे.

ETimes शी बोलताना मर्चंट पुढे म्हणाले, "आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मला खरेदीदारांकडून बरेच कॉल येत आहेत. त्यांना अपार्टमेंट खरेदी करायचे आहे. बरेच गुंतवणूकदार आहेत ज्यांना ते विकत घ्यायचे आहे. पण मालकाला ते विकायचे नाही. ते." घराचा मालक दरमहा 5 लाख रुपये भाडे मागत असल्याचे पूर्वी सांगण्यात आले होते. त्यामुळे या घराला भाडेकरू न मिळण्याचे एक कारण आहे.

अडा शर्मा 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आली. अदाचा नुकताच कमांडो डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com