बॉलिवूडची सौंदर्याची खाण म्हणजे रेखा (Rekha) या आहेत. त्यांनी आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे. त्या एक उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना आहेत. रेखा या कायमच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चांवर आजही बोले जाते. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडायची. त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांच्या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. नुकतीच अभिनेत्रीने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show ) या कार्यक्रमात हजेरी लावली.
'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमात रेखा यांनी 'सलाम-ए-इश्क' या गाण्यावर सुरेख डान्स केला. मात्र कपिलच्या शोमध्ये एक ट्विस्ट आला. 'सलाम-ए-इश्क' या गाण्यावर रेखासोबत कृष्णाने अमिताभचा आयकॉनिक लूक रिक्रिएट करून डान्स केला. दोघेही एकत्र डान्स करताना खूप भन्नाट दिसत होते. रेखाच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले. कृष्णाला (Krushna Abhishek) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या रुपात रेखा यांच्या सोबत पाहून प्रेक्षकांनी जल्लोष केला.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी रेखा यांनी खूप खास लूक तयार केला होता. त्यांनी कांजीवरम साडी नेसली होती. त्यांनी गोल्डन रंगाची साडी आणि लाल ब्लाउज परिधान केला होता. सोन्याचा नेकलेस,बांगड्या, कानातले आणि ग्लॅमरस मेकअपने त्यांचे सौंदर्य खुलून आले होते. तर कृष्णाने अमिताभ बच्चन यांच्या सारखा लूक करण्यासाठी पांढरा पोशाख परिधान केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.