Shahrukh Khan In Brahmastra  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Brahmastra: किंग खान शाहरुख खानला याआधी असं कधीच बघितलं नसेल, पाहा दमदार अवतार

'ब्रह्मास्त्र'च्या टीझरशिवाय या सिनेमातील पात्रांचे फस्ट लूक एकापाठोपाठ एक रिलीज करण्यात आले. आता निर्मात्यांनी या सिनेमातील किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचा 'ब्रह्मास्त्र' हा या वर्षातील बहुप्रतीक्षित सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. अयानने यापूर्वी रणबीर कपूरसोबत 'वेक अप सिड' आणि 'ये जवानी है दीवानी'मध्येही काम केले आहे. हे दोन्ही सिनेमा अयानच्या करिअरमधील ब्लॉकबस्टर ठरले आहेत. 'ब्रह्मास्त्र'च्या टीझरशिवाय या सिनेमातील पात्रांचे फस्ट लूक एकापाठोपाठ एक रिलीज करण्यात आले. आता निर्मात्यांनी या सिनेमातील किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.

बॉलिवूडचा रोमान्स किंग शाहरुख खान एकापाठोपाठ एक सिनेमांमध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसत आहे. 'रॉकेटरी', त्यानंतर 'लाल सिंग चड्ढा' आणि आता ब्रह्मास्त्र'मध्येही तो पाहुणा कलाकार म्हणून या सिनेमाचा भाग होणार आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला असून, यामध्ये शाहरुख खान वानर अवतारात जबरदस्त अॅक्शनमध्ये दिसत आहे. पॉवर आणि एनर्जीने भरलेला शाहरुख खानचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जीने काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओद्वारे त्याच्या 'ब्रह्मास्त्र'ची कथा लोकांसमोर आणली होती. 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा अस्त्रावरील अनोख्या विश्वावर आधारित आहे. अस्त्रांचा जन्म ब्रह्मशक्तीपासून झाला. वारा, पाणी, अग्नी इत्यादी निसर्गाच्या विविध रूपांची शक्ती या अस्त्रांमध्ये सामावलेली आहे. यामध्ये नंदी आणि वानर यांचाही समावेश आहे. साउथचा प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन नंदीच्या भूमिकेत दिसणार आहे तर या सिनेमात शाहरुख खान वानराच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील महानायक अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट अशा प्रसिद्ध कलाकारांची 'ब्रह्मास्त्र-पार्ट वन'मध्ये प्रमुख भूमिका आहे. यासोबतच साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता नागार्जुनही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधी, अयान त्याच्या पात्रांचे बॅक-टू-बॅक लूक रिलीज करून चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT