Pankaja Munde: कॉलेजमध्ये कोणी तुम्हाला प्रपोज केलंय का? पंकजा मुंडेंनी सांगितला 'तो' किस्सा

'बस बाई बस' या या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना विविध राजकीय घटना, पक्ष आणि इतर खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
Pankaja Munde
Pankaja MundeSaam Tv

मुंबई- झी मराठी वाहिनीवर 'बस बाई बस' हा कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस, मेधा मांजरेकर या सहभागी झाल्या आहेत. आता या कार्यक्रमात, पंकजा मुंडे (Pankaja Munde) या देखील हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत. यावेळी सुबोध भावे यांनी पंकजा मुंडे यांना तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी मज्जेशीर उत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला कुणी प्रपोज नाही केलं. तो सुखद अनुभव मला कधीच मिळाला नाही”. कॉलेजमध्ये शिकत असताना गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री होते. त्यामुळे मला भरपूर सिक्युरिटी असायची. म्हणून माझ्याशी कोणीही बोलायला घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली, मगती कायम टिकली,” असं त्यांनी नमूद केलं.

Pankaja Munde
Nanded News : नांदेड शहरात इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुमला भीषण आग; लाखाेंचे नुकसान

दुसऱ्या पक्षतील आमदार कधी फोडलेत का?

एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू असे म्हणत पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाचे भन्नाट उत्तर दिले आहे. होय मी दुसऱ्या पक्षतील आमदारांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय.

राजकारणात आणि युद्धात जिंकणं चांगलं असत. अशा परिस्थिमध्ये आपल्या शोभेल असे लोक घेण्याचा मी प्रयत्न करते. बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे. नमिता मुंदडा यांनी मी आमदार केलं आहे. शिवाय सुरेश धसही भाजपत आले. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षांतील चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com