Lady Commando SaamTv
मनोरंजन बातम्या

PM Modi : नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत असलेल्या महिला कमांडोची जोरदार चर्चा; कंगना रणौत झाल्या चाहत्या

Woman Commando Guarding PM Modi : पंतप्रधान मोदी यांच्या मागे उभ्या असलेल्या एका महिला कमांडोचे छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे. अभिनेत्री-खासदार कंगना रणौतन यांनी देखील हे छायाचित्र त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

Saam Tv

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभ्या असलेल्या एका महिला कमांडोचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री-खासदार कंगना रणौतन यांनी देखील हे छायाचित्र त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत "लेडी एसपीजी" असे म्हटले आहे आणि त्यासोबत आग लावणारे इमोजीही जोडले आहेत. हे छायाचित्र संसदेमध्ये सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यानचे आहे.

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या महिला कमांडोला नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तैनात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचा (SPG) भाग असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, एसपीजी कमांडोच्या तैनाती व मूळ सेवा यासंबंधी माहिती सार्वजनिक केली जात नाही. उपलब्ध माहितीनुसार, एसपीजीमध्ये सध्या सुमारे 100 महिला कमांडो आहेत.

संसद भवनातील SPG महिला कमांडो

मोदी यांच्या मागे दिसलेल्या महिला कमांडोचे छायाचित्र संसद भवनातील आहे. येथे SPG कमांडो नेहमीच तैनात असतात. महिला कमांडो सहसा संसद गेटवर महिला पाहुण्यांची तपासणी करतात आणि संसद परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवतात.

SPG म्हणजे काय?

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ही भारत सरकारच्या अखत्यारीत येणारी सुरक्षा यंत्रणा आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1985 साली या संघटनेची स्थापना झाली. सुमारे 3 हजार सदस्यांच्या या यंत्रणेवर सध्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT