Kiran Gaikwad: ही माझी होणारी 'होम मिनिस्टर'; देवमाणूस फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली; होणारी बायको आहे प्रसिद्ध अभिनेत्री

Kiran Gaikwad Confess his Love: देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडने प्रेमाची कबुली दिली आहे. त्याने होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Kiran Gaikwad
Kiran GaikwadSaam Tv
Published On

मराठमोळा अभिनेता किरण गायकवाडने प्रेमाची कबुली दिली आहे. किरण गायकवाडने त्याच्या लाइफ पार्टनरचं नाव सांगितलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरण गायकवाड हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. त्याने आज त्याची होणार लाइफ पार्टनर कोण हे सांगितले आहे. (Kiran Gaikwad Post)

किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर या दोघांनी प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत किरणने ही माहिती दिली आहे.

Kiran Gaikwad
Reshma Shinde Husband: हळद लागली, नवरी सजली; रेश्मा शिंदेच्या नवऱ्याला पाहिलात का?

किरण गायकवाडने देवमाणूस या मालिकेत खलनायक म्हणून काम केले होते. त्यानंतर मालिकेतील मुख्य कलाकार असलेल्या अस्मितानेदेखील पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर किरण आणि अस्मिताच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता किरणने या चर्चांना पूर्णविराम देत त्याच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीबद्दल सांगितले आहे.

किरण गायकवाडने वैष्णवी कल्याणकरसोबत फोटो पोस्ट केला आहे. त्यावर माझी होणार होम मिनिस्टर असं कॅप्शनदेखील दिलं आहे. (Kiran Gaikwad-Vaishnavi Kalyankar)

किरणची पोस्ट

किरण आणि वैष्णवीने खास फोटोशूट केले आहे. त्यात किरण आणि वैष्णवीने पारंपारिक लूक केला आहे. वैष्णवीने साडी नेसली आहे तर किरणने व्हाईट कलरचा कुर्ता पायजमा घातला आहे. या फोटोत किरण वैष्णवीकडे पाहताना दिसत आहे. हे दोघेही फोटोत खूपच क्युट दिसत आहेत.

“तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस;पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे “ मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील ,मंत्री पद वाटत राहतील ,त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर” !, असं कॅप्शन किरणने दिलं आहे.

वैष्णवी कल्याणकर हीदेखील अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने तू चाल पुढं या मालिकेतदेखील काम केले आहे. तिने देवमाणूस मालिकेतदेखील काम केले आहे. ती सध्या सन मराठीवरील तिकळी या मालिकेत काम करत आहे. (Kiran Gaikwad Girlfriend)

Kiran Gaikwad
Shilpa Shetty Ed Raids: शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची छापेमारी; पती राज कुंद्रा मोठ्या अडचणीत, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com