The 50 Winner  saam tv
मनोरंजन बातम्या

The 50 Winner : 'द ५०'च्या ट्रॉफीवर शिव ठाकरेनं कोरलं नाव? सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या लेकाचं होतंय कौतुक

Shiv Thakare Winner Of The 50 : 'द ५०' शोची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा पाहायला मिळत आहे. या शोचा विजेता महाराष्ट्राचा मुलगा शिव ठाकरे झाला असल्याचे बोले जात आहे.

Shreya Maskar

'द ५०' सध्या चांगलाच चर्चेत पाहायला मिळत आहे.

'द ५०' शोचा विजेता शिव ठाकरे झाला असल्याचे बोले जात आहे.

'द ५०' शोमध्ये एकूण ५० स्पर्धक पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त 'द ५०' शोची चर्चा पाहायला मिळत आहे. या शोमध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही कलाकार पाहायला मिळत आहेत. 'द ५०'शोच्या विजेत्याचे नाव समोर आले आहे. हा ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. 'द ५०' ची ट्रॉफी महाराष्ट्राकडे आली आहे. 'रिॲलिटी शो किंग' मराठमोळा शिव ठाकरे 'द ५०' चा विजेता झाला असल्याचे बोले जात आहे. तसेच उपविजेत्यांची यादी देखील समोर आली आहे. अनेकांनी शिव ठाकरे विजेता झाल्याची पोस्ट शेअर केली आहे.

बक्षीस काय?

असे बोले जात आहे की, 19 फेब्रुवारी रोजी मुंबईत 'द ५०'चा ग्रँड फिनाले पार पडला आहे. 50 तगड्या स्पर्धकांना मागे टाकून शिव ठाकरेने विजेते पद पटकावले आहे. शेवटचा सामना शिव ठाकरे आणि मिस्टर फैजूमध्ये रंगला. मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरेला ट्रॉफीसोबत तब्बल 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

'द ५०'चा उपविजेता कोण?

मीडिया रिपोर्टनुसार, 'द ५०' शोचा पहिला उपविजेता सोशल मिडिया स्टार मिस्टर फैजू आहे. त्याने शोमध्ये अनेक टास्क जिंकले आहेत. तर फिटनेस क्वीन कृष्णा श्रॉफने 'द ५०' ची दुसरी रनर-अप ठरली आहे. 'द ५०'च्या टॉप 4 मध्ये शिव ठाकरे, फैजू, रजत दलाल, कृष्णा श्रॉफ हे स्पर्धक होते.

मात्र अद्याप 'द ५०' संपल्याची आणि शिव ठाकरे विजेता झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला आहे. 'द ५०' या शो मध्ये हिंदी सोबतच मराठी कलाकार देखील पाहायला मिळाले. यात शिव ठाकरे, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सौरभ घाडगे या कलाकारांचा समावेश होता.

शिव ठाकरे वर्कफ्रंट

शिव ठाकरे हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. तसेच त्याने 'बिग बॉस हिंदी 16'मध्ये उपविजेता पद पटकावले. त्याने आजवर अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. तसेच तो 'रोडीज 15' चा उपविजेता, '"खतरों के खिलाडी 13' चा उपविजेता आणि 'झलक दिखला जा' चा उपविजेता ठरला आहे. शिव ठाकरेचा मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! तुमचा कॉल डिटेल रेकॉर्ड विकला जातोय; पोलिसांचाच हात असल्याच्या दाव्याने खळबळ

CJP आणि काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान भाजपला मिळाली खूशखबर; तीन ठिकाणी दणदणीत विजय

Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update : सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी कारवाई; अधीक्षिका निलंबित करण्याचे आदेश

Shivsena : शिवसेना कुणाची? सुनावणी पुन्हा लांबणीवर; कारण आले समोर

SCROLL FOR NEXT