मराठी अभिनेत्री रेवती लेले लग्न बंधनात अडकली आहे.
रेवतीचा नवऱ्याचे कला क्षेत्राशी खास कनेक्शन आहे.
रेवतीने लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. तिच्या लग्न सोहळ्याचे खास फोटो समोर आले आहेत. गेले काही दिवसांपासून रेवती लेलेच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. तिने सोशल मीडियावर ग्रहमख समारंभ, मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. रेवतीने प्रेमाची कबुली दिल्या पासून तिचा जोडीदार कोण आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. रेवतीने देखील खूप वेळापासून तिच्या नवऱ्याचा चेहरा लपवला होता. मात्र आता रेवतीचा नवरा कोण? हे समोर आले आहे.
रेवती लेलेने कौशिक भिडेसोबत लग्नगाठ बांधली आहे. कौशिक भिडे हा अभिनेता नसून तो कला क्षेत्राशी संबंधित काम करतो. दोघांनी लग्न सोहळ्यासाठी पारंपरिक लूक केला होता. दोघे एकत्र खूपच छान दिसत होते. रेवतीने सुंदर पिवळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्याला हिरवा काठ होता. केसांचा बन, मराठमोळा साज श्रृंगार, हातात हिरवा चुडा, नाकात नथ, कपाळावर मुंडावळ्या बांधल्या होत्या. नवराईच्या रुपात रेवतीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तर कौशिकने लाल आणि पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोषाख परिधान केला होता. दोघे एकत्र खूपच आनंदी दिसत होते.
रेवती लेलेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर चाहते, कलाकार कमेंट्सचा वर्षाव करत आहे. दोघांनी नवीन आयुष्यासाठी, लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. फोटोंवर हृता दुर्गुळे, समृद्धी केळकर, विशाल निकम अशा अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रेवतीचे चाहते आता रेवती आणि कौशिकची लव्ह स्टोरी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
रेवतीने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. 'स्वामिनी', 'लग्नाची बेडी' , 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या मराठी मालिकांमध्ये ती झळकली.
कौशिक भिडे डिझायनिंग क्षेत्रात काम करतो. तसेच तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो ट्रॅव्हलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. त्याचा Desko (डिस्को) नावाचा ब्रँड देखील आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.