Tharala Tar Mag Actress Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag Actress: नवऱ्याच्या, लेकीच्या कारने खूप फिरले आता स्वत:ची हवी; 68 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण

Jyoti Chandekar Buy A New Car: ज्योती चांदेकर यांनी त्यांच स्वत:च स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्रीने स्वत:ची नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे

Manasvi Choudhary

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ज्योती चंदेकर यांनी चाहत्यासाठी आनंदाची दिली आहे. ज्योती चांदेकर या सध्या ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत ज्योती चांदेकर या पूर्णा आजीची भूमिका साकारत आहे. नुकतंच ज्योती चांदेकर यांनी त्यांच स्वत:च स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्रीने स्वत:ची नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे. याचनिमित्ताने त्यांची मुलगी तेजस्विनी पंडीतने आईसाठी खास पोस्ट लिहली आहे. पोस्टमध्ये तेजस्विनीने आईचं कौतुक केलं आहे.

तेजस्विनी पंडितने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये,ज्योती चांदेकर...५२ वर्षाची कारकीर्द! आजतागायत २०० पेक्षा जास्त पुरस्कार नावावर असणारी मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आणि मग माझी आई. आई यासाठी नंतर कारण काही व्यक्तिमत्त्व ही कामासाठी आधी आणि घरच्यांसाठी नंतर बनलेली असतात.आईने काम सुरु केलं तेव्हा ती १२ वर्षांची होती. मग तिचं लग्न झालं तरी तिनं काम करणं सोडलं नाही. मग 2 मुली झाल्या. आम्हाला बरोबर घ्यायची आणि ‘ती’ कायम काम करायची. मग मुली कमवायला लागल्या तरीही ‘ती’ काम करतच होती आणि अजूनही ‘ती’ काम करतेच आहे, असं तेजस्विनीनं म्हटलंय.

पुढे तेजस्विनीने,To cut it short या सगळ्या प्रवासात तिची एक तक्रार होती. खूप फिरले… बसने, ट्रेनने, लोकल गाड्यांनी, आधी बाबाने घेतलेल्या, मग लेकीने घेऊन दिलेल्या, मग काही काळ धैर्यच्या गाडीने प्रवास केला… आता मला माझी गाडी हवी आहे आणि शेवटी या हट्टी बाईनं, माझ्या आईनं वय वर्ष ६८ व्या वर्षी तिच्या कमाईची, स्व:कष्टाची, स्वतःची गाडी घेतलीच!माझ्या आईच्या तिच्या कामाप्रती असलेली श्रद्धा आणि जिद्दीला सलाम आणि माझ्यासाठी तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून नकळत ही ठरली आमच्यासाठी ‘येक नंबर मोमेंट’.आई तुला खूप प्रेम. आणि सगळ्यांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा! असं तेजस्विनीनं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT